vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

बुलढाण्याच्या अथर्व ताठेची राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी

बुलढाण्याच्या अथर्व ताठेची राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी

बुलढाणा प्रतिनिधी : आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे 26 मार्च ते 7 एप्रिल 2026 दरम्यान पार पडलेल्या 15 वी NTPC चेचुकरी लेनिन ढोला स्मृती ‘मिनी’ (U-15), 7 वी ‘किड्स’ (U-10) व 2 री ‘किड्स’ (U-13) राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याच्या अथर्व देवानंद ताठे याने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचा मान उंचावला आहे.

अथर्व ताठे याने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत U-15 गटात देशभरातून चौथा क्रमांक पटकावला. तसेच कंपाऊंड बायडिंग प्रकारात महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवून देत राज्याच्या यशात मोलाचा वाटा उचलला. यापूर्वी सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत अथर्वने राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. सातत्यपूर्ण मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर त्याने राष्ट्रीय स्तरावरही आपली छाप पाडली आहे.

 अथर्वच्या या यशामागे आंतरराष्ट्रीय तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग (शिवबा आर्चरी अकॅडमी, बुलढाणा) यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्वने यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अथर्वच्या या यशामुळे बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याचा क्रीडा क्षेत्रात अभिमान उंचावला असून सर्व स्तरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी जालन्याचे १५ कराटेपटू दिल्लीला रवाना; सेन्साई रूपेंद्र पारचा यांच्याकडे महाराष्ट्र संघाचे टीम मॅनेजरपद तालकटोरा इंटरनॅशनल स्टेडियमवर २३ व २४ जुलैला होणार राष्ट्रीय स्पर्धा; जालन्याच्या खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा…

नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या चुरशीच्या लढती

vishwatmaklokswamivarta

भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने बेल्जियमविरुद्धच्या शानदार विजयाने युरोप दौऱ्याची सुरुवात केली.

vishwatmaklokswamivarta

सरस्वती भुवन प्रशालामध्ये राज्य़ क्रीडा दिनाचे उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’; पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी घेतला आढावा

हॉकी शताब्दी वर्षानिमित्त ७ नोव्हेंबरला देशभरात ४०० सामने आयोजित

vishwatmaklokswamivarta