नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या चुरशीच्या लढती
नवी मुंबई प्रतिनिधी- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद ठाणे यांच्या सहकार्याने, नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या माध्यमातून नवी मुंबई पोलिस मुख्यालय, रोडपाली, कळंबोली येथील सुसज्ज अशा कुस्ती प्रशिक्षण केंद्रात नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय “कुस्ती” स्पर्धा 2025-26 विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागातून कुस्ती मॅटवर यशस्वी रितीने झाल्या.
या स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून १४,१७ व १९ वर्षाआतील १०५ मुले व ४९ मुली असे एकुण १५४ खेळाडू सहभागी झाले होते. ऑलम्पिक स्तरावर खेळला जाणा-या कुस्ती खेळात आता नवी मुंबई शहरातील खेळाडूंचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे.
फ्री स्टाईल प्रकारात मुलांच्या १४ वर्षाआतील वयोगटामध्ये ३५ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – रणवीर संतोष जाधव, नमुंमपा शाळा क्र. ३६ कोपरखैरणे, ३८ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – संजय बबन शिंदे, नमुंमपा शाळा क्र. ३१ कोपरखैरणे, ४१ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – ओमकार अनिल पाटोळे, न्यु बॉम्बे सिटी स्कूल CBSE घणसोली, ४४ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक- प्रशांत निलेश पाईकराव, नमु़ंमपा शाळा क्र. ३६ कोपरखैरणे, ४८ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – वेदांत विलास साळवी, नमुंमपा शाळा क्रमांक ०९ नेरुळ, ५२ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – तस्मय थोरात, रायन इंटरनॅशनल स्कूल सानपाडा, ५७ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – जोतीराम शंकर पाटील, न्यू बॉम्बे सिटी स्कूल घणसोली, ६२ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – रोनक राजकुमार विश्वकर्मा, न्यु बॉम्बे सिटी स्कूल घणसोली, ६८ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – आयुष ज्ञानदेव गोसावी, ज्ञानविकास विद्यालय कोपरखैरणे यांनी पटकावला.
१४ वर्षाआतील मुलींच्या ३३ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – ओमी प्रदीप गायकवाड, डी.आर.पाटील विद्यालय तुर्भे, ३६ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – संशिखा महावीर शर्मा, नमुंमपा शाळा क्र.७४ कोपरखैरणे, ३९ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक- उर्वी उमेश माने, जयपुरीयार स्कूल सानपाडा, ४२ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – शबाना शबीर शेख, नमुंमपा शाळा क्र.३६ कोपरखैरणे, ४६ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – तिथी थोरात, रायन इंटरनॅशनल स्कूल सानपाडा, ५० किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – सरस्वती राजू चिन्नीराठोड, नमुंमपा शाळा क्र.१२२ कोपरखैरणे, ५४ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक- पूर्वा विजय पवार, नमुंमपा शाळा क्र.३६ कोपरखैरणे, ६२ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – स्मरणिका राहुल बनसोडे, भारती विद्यापीठ सीबीडी बेलापूर यांनी संपादन केला.
या स्पर्धेतील मुलांच्या १७ वर्षांखालील वयोगट ४५ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – कुंदन जयवंत भोईर, शिरवणे विद्यालय इंग्रजी माध्यम शिरवणे, ४८ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – सक्षम राकेश गायकवाड, नमुंमपा शाळा क्र. १२२ कोपरखैरणे, ५१ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – आदर्श शंकर पाटील, डॉ. सी. वि. सामंत माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय तुर्भे, ५५ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक- विश्वजीत नवनाथ गायकवाड, मदर तेरेसा सेकंडरी कॉन्व्हेन्ट स्कूल दिवा गांव ऐरोली, ६० किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – सिध्दांत महादेव जाधव, मॉडर्न स्कूल वाशी, ६५ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – मकरंद विकास पाटील, डॉ. सी. वी. सामंत माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय तुर्भे, ७१ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – यश चांगदेव जाधव, मदर तेरेसा सेकंडरी स्कूल दिवागाव ऐरोली, ८० किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – प्रसाद सुरेश खैरे, नमुंमपा शाळा क्र.१२२ कोपरखैरणे, ९२ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – प्रशांत दत्तात्रय पांढरे, मदर तेरेसा सेकंडरी स्कूल दिवागाव ऐरोली, ११० किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – ओमकार दत्ता गायकवाड, क्राईस्ट अकॅडमी स्कूल कोपरखैरणे यांनी मिळविला.
१७ वर्षाआतील मुलींच्या गटात ४३ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – सिमा विजयकुमार राठोड, नमुंमपा शाळा क्र.३६ कोपरखैरणे, ४६ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – वैष्णवी शंकर पाटील, न्यु बॉम्बे सिटी स्कूल घणसोली, ४९ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – तन्वी विभुते, क्राईस्ट अकॅडमी कोपरखैरणे, ५३ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – करुणा राजेंद्र भणगे, डॉ. सी. वी. सामंत माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय तुर्भे, ६१ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक- कामिनी किशोर पाटील, भारती विद्यापीठ सीबीडी, बेलापूर यांनी पटकाविला.
१९ वर्षे आतील मुलांच्या गटात ५७ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक- प्रेम सागर गायकवाड, आर.एफ.नाईक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बोनकोडे कोपरखैरणे, ७९ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक- शुभम शंकर नरळे, विद्याभवन हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज नेरुळ यांनी संपादन केला.
१९ वर्षाखालील मुलींच्या गटात ५९ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – संस्कृती झायगुडे, सुशिलादेवी देशमुख ज्युनिअर कॉलेज, ऐरोली हीने मिळविला.
ग्रीको रोमन स्टाईल १७ वर्षाआतील मुलांच्या गटात ५१ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – सार्थक धनावडे, ज्ञानविकास विद्यालय कोपरखैरणे, ६० किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक – सागर नरळे, विद्याभवन हायस्कुल नेरुळ, ६५ किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक- श्लोक पाटील, वेस्टर्न कॉलेज सानपाडा यांनी पटकाविला.
१९ वर्षाखालील मुलांच्या गटात ७९ किलो खालील वजनी गटात अथर्व तानाजी जाधव, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. या नमुंमपा जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत नवी मुंबई शहरातील खेळाडूंनी यश संपादन केले असून पुढील मुंबई विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी ते पात्र ठरलेले आहेत. या खेळाडूंचे अभिनंदन करीत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, क्रीडा विभागाच्या उपआयुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव यांनीही यशस्वी खेळाडूंचे अभिनंद केले आहे.
या स्पर्धा आयोजनासाठी पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) यांचेकडून कुस्ती हॉल व मॅट सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. स्पर्धा आयोजनामध्ये ठाणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे पंच श्री. श्रीराम पाटील, श्री. सतिश म्हात्रे, नवी मुंबई कुस्ती संघाचे पदाधिकारी श्री. दत्तात्रय डुबे, श्री. धनंजय माने, श्री.संदीप दळवी तसेच एनआयएस कोच श्री.संपत्ती मधुकर येळकर, क्रीडा प्रमुख व नवी मुंबई पोलीस यांची संपूर्ण तांत्रिक मदत मिळाल्याने स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाल्या.
शालेय क्रीडा स्पर्धेतील नवी मुंबईतील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा तसेच महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थीही या स्पर्धेत प्राधान्याने सहभागी व्हावेत याकरीता महानगरपालिका क्रीडा विभागाकडून शिक्षण विभागास संपूर्ण सहकार्य केले जात असून कुस्तीसारख्या देशी खेळातही नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थी घवघवीत यश संपादन करताना दिसत आहेत.