vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

जिल्हा क्रीडा संकुलात अद्ययावत सुविधांसाठी आराखडा तयार करा- पालकमंत्री जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत दिल्या सूचना…

जिल्हा क्रीडा संकुलात अद्ययावत सुविधांसाठी आराखडा तयार करा- पालकमंत्री जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत दिल्या सूचना…

 

        सांगली, प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा संकुलात आवश्यक अद्ययावत सोयी सुविधा पुरविण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करून त्याचे पुढील आठवड्यात सादरीकरण करावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या.

   जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.

   पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा क्रीडा संकुलात 400 मीटर धावन मार्गाचे सिंथेटीक धावन मार्ग, बॅडमिंटन हॉलचे अद्ययावतीकरण, जलतरण तलाव दुरूस्ती, कबड्डी, खो-खो खेळाकरिता डोमची सुविधा, जलतरण तलावासाठी सौर ऊर्जा पॅनेल, बाह्यस्त्रोतातून संकुल देखभाल व कार्यालयीन कामासाठी कर्मचारी नियुक्ती, आदि कामांसाठी सविस्तर आराखडा तयार करावा व त्याचे सादरीकरण पुढील आठवड्यात करावे. ही सर्व कामे तात्काळ सुरू करून ती येत्या वर्षभरात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. क्रीडा संकुलातील सोयी-सुविधा वाजवी भाडे तत्त्वावर देण्यासाठी ‍नियमावली तयार करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रलंबित बुद्धिबळ भवन उभारणीसंदर्भातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन पुढील कार्यवाहीसंदर्भात आराखडा तयार करण्याबाबत सूचना केल्या. तसेच, जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलच्या सद्यस्थितीची पाहणी करून तो अद्ययावत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

 यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनीही क्रीडा संकुलातील सोयी-सुविधा वाजवी भाडे तत्त्वावर देऊन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या.

    जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून जिल्हा क्रीडा संकुलात आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याबाबतच्या कामांची सविस्तर माहिती दिली.

 

00000

संबंधित पोस्ट

मिशन लक्षवेध’ अंतर्गत जिल्हास्तर प्रतिभा विकास केंद्रासाठी निवड चाचणी खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे

कोल्हापुरचा अजिंक्य रेडकर नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा विजेता-नेरूळच्या निरंत पाटील याने पटकाविला नमुंमपा क्षेत्र श्री सन्मान

जिद्दीच्या जोरावर रंगला अंध मुलांचा क्रिकेट सामना रोमहर्षक स्पर्धेत टीम शिवनेरी संघाचा विजय- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्नमधील आणखी एक उपक्रम

जालना येथे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत युवा आणि क्रीडा संवाद..

vishwatmaklokswamivarta

अंकित राठोडने लॅब मास्टर चॅम्पयनशिपमध्ये स्पर्धत सर्वप्रथम क्रमांक पटकावला  १५ विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला