vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत युवा आणि क्रीडा संवाद..

विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत युवा आणि क्रीडा संवाद..

      जालना, प्रतिनिधी: मंत्री, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ यांच्या अध्यक्षतेखाली विकसित महाराष्ट्र 2047अंतर्गत राज्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय व राज्य युवा पुरस्कारार्थी, युवकांसाठी कार्य करणा-या संस्था, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक, खेळाडूंचे पालक, संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत युवा व क्रीडा संवाद आयोजित करण्यात येत आहे.

     युवा व क्रीडा संवादाचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील युवा आणि क्रीडा क्षेत्रातील युवक, युवती, खेळाडू, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक, खेळाडूंचे पालक, संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या अडी-अडचणी समजून घेऊन क्रीडा क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविण्याचे व्यासपीठ आहे.

    छत्रपती संभाजीनगर विभागातील “विकसित महाराष्ट्र 2047अंतर्गत युवा आणि क्रीडा संवाद” हा कार्यक्रम दिनांक 25 ऑक्टोबर, 2025रोजी सकाळी 11.00वाजता संत एकनाथ रंगमंदिर, छत्रपती संभाजीनगर येथे मंत्री, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास जालना जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू (मागील 5-7 वर्षातील) प्रशिक्षक/क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीयस्तरावर यश मिळविलेल्या खेळाडूंचे मार्गदर्शक, निवडक राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे पालक, जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील अनुभवी आणि मान्यताप्राप्त क्रीडा तज्ज्ञ किंवा संघटनांचे प्रतिनिधी, क्रीडा पत्रकार, राज्य व राष्ट्रीय क्रीडा, युवा पुरस्कारार्थी यांनी उपस्थित राहावे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांनी क्रीडा अधिकारी श्रीमती लता लोंढे मो. 9850333326, क्रीडा मार्गदर्शक आशिष जोगदंड मो. 8888346828 यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त खेळाडू, क्रीडा संघटक, मार्गदर्शक, क्रीडा शिक्षक, खेळाडूंचे पालक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

कराटे योद्धा एसोसिएशनच्या विजेत्यांची,थाई बॉक्सिंग विभागीय चॅम्पियनशिप २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी….

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तर शालेय बॉक्सिंगचा स्पर्धेचा थरार 26 सप्टेंबर पासून

vishwatmaklokswamivarta

क्रीडा पुरस्कार 2023-24 साठी-26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्जमागणी..

vishwatmaklokswamivarta

क्रीडा स्पर्धेतून खिलाडु वृत्ती विकसित व्हावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

जागतिक स्कूल हॅालिबॅाल चॅम्पियनशिप; 15 वर्षाआतील मुला-मुलींकरीता निवड चाचणी…

ॲथलेटिक्स खेळाडूच्या निवड चाचणीचे आयोजन