vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

राज्यस्तर शालेय बॉक्सिंगचा स्पर्धेचा थरार 26 सप्टेंबर पासून

राज्यस्तर शालेय बॉक्सिंगचा स्पर्धेचा थरार 26 सप्टेंबर पासून

खेळ प्रतिनिधी-रायगड-अलिबाग, शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अधिपत्याखाली क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत रायगड जिल्ह्यास बॉक्सिग, खो-खो, हॅण्डबॉल, टेबल टेनिस, कबड्डी आणि कुस्ती या खेळांचे विविध वयोगटात्त राज्यस्तर स्पर्धा यजमानपद देण्यात आले आहे. या 6 खेळापैकी बॉक्सिग खेळाचे 17 वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या स्पर्धाचे आयोजन दि. 25 ते 28 सप्टेंबर 2025 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकूल नेहूली-संगम अलिबाग येथे होणार आहे.

या राज्य स्पर्धेत राज्यातील 8 महसूल व 1 राज्य क्रीडा प्रबोधिनीचा संघ असे विभागातील जवळपास 300 खेळाडू, संघव्यवस्थापक व मार्गदर्शक सहभागी होणार आहेत. या स्पर्धांमधून विजयी स्पर्धक हा राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. बॉक्सिंग स्पर्धेचा प्रचार प्रसार व्हावा तसेच जिल्ह्यात सर्वदुर या खेळाची वातावरण निर्मिती व्हावी या उद्देशाने तालुका संकूल समितीच्या माध्यमातून नेहूली येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रशस्त बंदिस्त हॉलमध्ये नव्या कोऱ्या बॉक्सिंग रिंगची स्थापना करण्यात आली असून राज्यातून येणाऱ्या बॉक्सर्सना आपला खेळाचा दर्जा सिध्द करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे..

या राज्यस्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दि.26 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, अलिबाग नेहुली-संगम येथील भव्य पटांगणात संपन्न होणार आहे.

0000000

संबंधित पोस्ट

फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे विजेतेपद पटकावणाऱ्या दिव्या देशमुखचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनीमध्ये २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरूप्रवेशासाठी २३ एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मराठवाड्यातील क्रीडा संकुले आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी पाठपुरावा करा – विभागीय आयुक्त जी. श्रीकां दर सोमवारीक्रीडा संकुल परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

जागतिक टेनिसच्या मैदानात महाराष्ट्राचा झेंडा

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत लातूरला निवासी क्रीडा निपुणता केंद्र;ॲथलेटिक्स व कुस्ती खेळाडूंची ७ व ८ एप्रिल रोजी नैपुण्य चाचणी

मिशन लक्षवेध’ अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी खेळाडूंची निवड चाचणी;30 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन