vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरूवात

जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरूवात

रायगड-अलिबाग, द प्रतिनिधी :-जिल्ह्यात दि. 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येत असून सर्व ग्रामपंचायतींमध्ये या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

या मोहिमेअंतर्गत गुरुवार, दि.25 सप्टेंबर रोजी ‘एक दिवस, एक तास, एक सोबत’ या उपक्रमांतर्गत सकाळी 8 ते 10 या वेळेत प्रत्येक गावात प्रत्यक्ष श्रमदान करून स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. या वेळी अस्वच्छता असलेली ठिकाणे, कार्यालये, संस्थात्मक इमारती, पर्यटनस्थळे, धार्मिक व आध्यात्मिक स्थळे, ऐतिहासिक वास्तू, नदीकिनारे, समुद्रकिनारे, प्रमुख रस्ते व उद्याने आदींची स्वच्छता करण्यात येईल.

या अभियानात लोकप्रतिनिधी,स्वच्छता प्रेमी नागरिक, युवक मंडळे, अधिकारी व कर्मचारी, एन.एस.एस. स्वयंसेवक, विविध संस्था प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. स्वच्छता करून जमा झालेला कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावला जाणार आहे. यासोबतच वृक्षारोपण, कोपरा बागांची निर्मिती, सुशोभीकरण तसेच सामुदायिक स्वच्छता शपथ घेणे अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच दि.26 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक तास स्वच्छता प्रबोधन संवाद कार्यक्रम होणार आहे. यामध्ये शिक्षक वर्गाकडून विद्यार्थ्यांना सार्वजनिक स्वच्छता, ओला-सुका कचरा वर्गीकरण, शौचालयाचा नियमित वापर आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभागामार्फत देण्यात आली आहे.

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र सदनात जिप्सीचा विशेष खेळ प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला केले संबोधि

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटनमहिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय खत विक्री आराखड्यांतर्गत आयएफएमएस व ॲग्रीस्टॅक प्रणालीचे एकत्रीकरणखत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता व सुलभता वाढणा खतांच्या मागणीसाठी सोईचे ॲप उपलब्ध होणार

अहिल्यानगरमध्ये महिला बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ भरारी..!३५३ कोटींचे विक्रमी कर्जवाटप ; सक्षमीकरणाचा नवा आदर्श