vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला केले संबोधि

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला केले ं संबोधित

राज्य प्रतिनिधी -श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठ आपल्या स्थापनेचा 550 वा वर्धापनदिन साजरा करत आहे, हा खरोखरच एक ऐतिहासिक प्रसंग आहे. गेल्या 550 वर्षांमध्ये, या संस्थेने काळाच्या असंख्य वादळांचा सामना केला; युगे बदलली, काळ बदलले, राष्ट्र आणि समाजाने अनेक स्थित्यंतरे अनुभवली, तरीही, बदलत्या काळात आणि आव्हानांमध्ये मठाने आपली दिशा कधीही गमावली नाही. याउलट, ते लोकांना मार्ग दाखवणारे एक मार्गदर्शक केंद्र म्हणून उदयाला आले: पंतप्रधान असे काही काळ होते, ज्या काळात गोव्यातील मंदिरे आणि स्थानिक परंपरांना गंभीर आव्हानांचा सामना करावा लागला, ज्या काळात भाषा आणि सांस्कृतिक अस्मितेवर दबाव आला, तरीही, या परिस्थितीत समाजाचा आत्मा कमकुवत होऊ शकला नाही; उलट, या आव्हानांनी तो अधिक मजबूत केला: पंतप्रधान,गोव्याचे हे एक आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे की येथील संस्कृतीने प्रत्येक बदलातून आपले सार जपले आहे आणि कालपरत्वे स्वतःचे पुनरुत्थानही केले आहे; या प्रवासात पार्तगळी मठासारख्या संस्थांनी मोठी भूमिका बजावली आहे: पंतप्रधान,आज भारत एका उल्लेखनीय सांस्कृतिक पुनरुत्थानाचा साक्षीदार होत आहे. अयोध्येतील राम मंदिराची पुनर्स्थापना, काशी विश्वनाथ धामचा भव्य जीर्णोद्धार आणि उज्जैनमधील महाकाल महालोकचा विस्तार— या सर्व गोष्टी आपल्या राष्ट्राच्या जागृतीचे प्रतिबिंब आहेत, ज्या आपल्या आध्यात्मिक वारशाला नव्या सामर्थ्याने समोर आणत आहेत: पंतप्रधानआजचा भारत आपल्या सांस्कृतिक अस्मितेला नव्या संकल्पासह आणि नव्याने प्राप्त झालेल्या आत्मविश्वासाने पुढे घेऊन जात आहे:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला संबोधित केले. या पवित्र प्रसंगी आपले मन गहन शांतीने भरले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. संतांच्या उपस्थितीत, त्यांच्या सोबत बसणे हा स्वतःच एक आध्यात्मिक अनुभव आहे, यावर त्यांनी भर दिला. येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तांमुळे या मठाची शतकानुशतके जुनी जिवंत शक्ती आणखी वाढली आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले की, आज या समारंभात लोकांमध्ये उपस्थित राहणे हे आपले भाग्य आहे. येथे येण्यापूर्वी आपल्याला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराला भेट देण्याचा सौभाग्य लाभले, असे त्यांनी सांगितले. तेथील शांतता आणि तिथल्या वातावरणामुळे या समारंभाची आध्यात्मिकता अधिक सखोल झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मोदी म्हणाले, “श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठ आपला 550 वा वर्धापनदिन साजरा करत आहे, जो एक अत्यंत ऐतिहासिक प्रसंग आहे. गेल्या 550 वर्षांमध्ये या संस्थेने अनेक उलथापालथींना तोंड दिले; युगे बदलली, काळ बदलला आणि देश आणि समाजात असंख्य स्थित्यंतरे झाली, तरीही मठाने कधीही आपली दिशा गमावली नाही. याउलट, हा मठ लोकांसाठी एक मार्गदर्शक केंद्र म्हणून उदयास आला आणि त्याची सर्वात मोठी ओळख ही आहे की, इतिहासात रुजलेला असूनही तो काळाबरोबर पुढे सरकत राहिला आहे.”

मठाची ज्या भावनेने स्थापना करण्यात आली, ती भावना आजही तितकीच जिवंत आहे. ती भावना म्हणजे साधनेला सेवेशी आणि परंपरेला लोककल्याणाशी जोडणे, असे त्यांनी नमूद केले. अध्यात्माचा खरा उद्देश जीवनाला स्थैर्य, संतुलन आणि मूल्ये प्रदान करणे हा आहे, हे या मठाने पिढ्यानपिढ्या समजावून सांगितले आहे, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. मठाचा 550 वर्षांचा हा प्रवास, कठीण काळातही समाजाला टिकवून ठेवणाऱ्या शक्तीचा दाखला आहे, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी या ऐतिहासिक प्रसंगी मठाधिपती श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामीजी, समितीचे सर्व सदस्य आणि या सोहळ्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा एखादी संस्था सत्य आणि सेवेच्या पायावर उभी राहते, तेव्हा ती काळाच्या बदलांमुळे डळमळीत होत नाही, तर त्याऐवजी समाजाला तग धरण्याची शक्ती देते. आज याच परंपरेचे सातत्य ठेवत हा मठ एक नवा अध्याय लिहित आहे, यावर त्यांनी भर दिलायेथे भगवान श्रीरामाचा 77 फूट उंच भव्य कांस्यधातूचा पुतळा स्थापित करण्यात आला आहे, असे त्यांनी नमूद केले. तीन दिवसांपूर्वीच आपल्याला अयोध्येतील भव्य अशा श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर ‘धर्म ध्वज’ फडकवण्याचा सौभाग्य लाभले होते, आणि आज येथे भगवान श्रीरामाच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य लाभले आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी रामायणावर आधारित थीम पार्कचेदेखील उद्घाटन करण्यात आले आहे, असे त्यांनी पुढे नमूद केले.या मठाशी संबंधित नवीन आयाम भविष्यातील पिढ्यांसाठी ज्ञान, प्रेरणा आणि आध्यात्मिक साधना यांचे कायमस्वरूपी केंद्र बनणार आहेत, यावर भर देऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथे विकसित होणारे संग्रहालय आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले त्रिमितीय नाट्यगृह मठाची परंपरा जपत आहेत आणि नवीन पिढीला त्याच्या वारशाबरोबर जोडणारे आहे, यावर भर दिला. त्यांनी नमूद केले की, त्याचप्रमाणे, देशभरातील लाखो भाविकांच्या सहभागाने 550 दिवसांहून अधिक काळ आयोजित केलेला श्री राम नाम जप यज्ञ आणि राम रथ यात्रा समाजातील भक्ती आणि शिस्तीच्या सामूहिक उर्जेचे प्रतीक बनली आहे. ही सामूहिक ऊर्जा आज देशाच्या कोनाकोपऱ्यात एक नवीन चेतना प्रसारित करीत आहे, यावर त्यांनी भर दिला.पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाशी अध्यात्माला जोडणाऱ्या व्यवस्था आगामी पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. या बांधकामाबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या भव्य उत्सवात, शतकानुशतके समाजाला एकत्र आणणाऱ्या आध्यात्मिक शक्तीला समर्पित अशा विशेष प्रसंगाचे प्रतीक म्हणून स्मृती नाणी आणि टपाल तिकिटे देखील जारी करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.

या मठामध्‍ये वाहणा-या निरंतर शक्तीचा प्रवाह द्वैत वेदांताचा दैवी पाया स्थापन करणाऱ्या महान गुरु परंपरेतून आला असल्याचे अधोरेखित करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवण करून दिली की, 1475 मध्ये श्रीमद् नारायण तीर्थ स्वामीजी यांनी स्थापन केलेला हा मठ त्या ज्ञान परंपरेचा विस्तार आहे. ज्याचे मूळ स्रोत अद्वितीय आचार्य, जगद्गुरु श्री मध्वाचार्य आहेत. यावेळी पंतप्रधानांनी या आचार्यांना आदराने नमन- वंदन केले. त्यांनी यावर भर दिला की, उडुपी आणि पार्तागली हे एकाच आध्यात्मिक नदीचे जिवंत प्रवाह आहेत आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्याच्या सांस्कृतिक प्रवाहाचे मार्गदर्शन करणारी गुरु-शक्ती एकच आहे. एकाच दिवशी या परंपरेशी संबंधित दोन कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळणे हा त्यांच्यासाठी एक विशेष योगायोग आहे, असेही त्यांनी असे नमूद केले.

या परंपरेशी संबंधित कुटुंबांनी पिढ्यानपिढ्या शिस्त, ज्ञान, कठोर परिश्रम आणि उत्कृष्टता यांना त्यांच्या जीवनाचा पाया बनवले आहे, ही गोष्‍ट अभिमानास्पद आहे; असे अधोरेखित करून, पंतप्रधान मोदी यांनी आवर्जुन सांगितले की, व्यापारापासून वित्तपुरवठा आणि शिक्षणापासून तंत्रज्ञानापर्यंत, त्यांच्यातील प्रतिभा, नेतृत्व आणि समर्पण या जीवनदृष्टीची खोलवर छाप पाडते. ते पुढे म्हणाले की, या परंपरेशी संबंधित परिवार आणि व्यक्ती म्हणजे यशाच्या अनेक प्रेरणादायी कथा आहेत आणि या सर्व यशामुळे ही मंडळी नम्र, मूल्ये जपतात आणि सेवेसाठी कार्यरत आहेत. या मूल्यांचे जतन करण्यासाठी हा मठ म्हणजे पायातील मूहूर्तमेढ आहे यावर भर देऊन, पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की ही मुहूर्तमेढ भविष्यातील पिढ्यांना ऊर्जा देत राहील.

संबंधित पोस्ट

कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष; प्रजासत्ताक दिनी अवतरणार आत्मनिर्भर ‘गणेशोत्सवा’चा भव्य चित्ररथ

vishwatmaklokswamivarta

एन.डी.आर.एफ.ची पथक कराड येथे दाखल

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी’ निर्माण करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी..

राज्यात 1 हजार 239 हेक्टरने कांदळवनांमध्ये वाढ प्रदूषणमुक्त वने आणि पर्यावरण यासाठी उपाययोजना करण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्ह्याअंतर्गत सुरक्षेचा आढावा…

हिंदुस्थानी संगीताचा स्वर प्रभाकर दिगंतात विसावला-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंडित प्रभाकर कारेकर यांना श्रद्धांजली…

vishwatmaklokswamivarta