vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान”स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार.

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान”स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार.

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. या उद्देशाने भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे राष्ट्रीय अभियान दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील या अभियानाचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या नेतृत्वाखाली होत असून, अंमलबजावणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या अधिपत्याखाली केली जात आहे.

अभियानाची उद्दिष्ट्येया अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण व शहरी भागांतील महिलांसाठी सर्वांगीण आरोग्य तपासणी करणे आणि जनजागृती घडवून आणणे हा आहे.• आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये दररोज तपासणी व जनजागृती शिबिरे.• ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महिला रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तज्ञ तपासणी शिबिरे.• आरोग्य उपकेंद्र स्तरावर प्राथमिक तपासणी (स्क्रिनिंग) शिबिरे.

उपलब्ध सेवा1. महिला आरोग्य तपासणी – उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंड/स्तन/गर्भाशयाचा कर्करोग, क्षयरोग तपासणी, किशोरवयीन मुली व महिलांसाठी ॲनिमिया तपासणी व समुपदेशन, आदिवासी भागात सिकल सेल तपासणी.2. माता व बाल आरोग्य सेवा – गरोदर मातांची प्रसूतीपूर्व तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, पोषणाविषयी मार्गदर्शन, बालकांचे लसीकरण.3. आयुष सेवा – आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध, नॅचरोपॅथी आदी उपचारपद्धती.4. जनजागृती व वर्तन बदल संवाद – मासिक पाळी स्वच्छता, पोषण, निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन.5. रक्तदान शिबीरे – १ ऑक्टोबर राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिनानिमित्त विशेष शिबिरे.6. नोंदणी व कार्ड वाटप – आयुष्मान भारत डिजीटल मिशन (ABDM), प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) कार्ड व सिकल सेल कार्ड वाटप.7. निक्षय मित्र नोंदणी – क्षयरुग्णांना पोषण सहाय्य मिळावे यासाठी स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींना जोडणे

जिल्ह्यातील प्रगती (आतापर्यंतची आकडेवारी)• उच्च रक्तदाब तपासणी : २६,०९०• मधुमेह तपासणी : २४,०७६• कॅन्सर तपासणी : १९,१७६• गरोदर माता तपासणी : २,९१४• रक्तक्षय तपासणी : १०,३९३• बालकांचे लसीकरण : ५,०५८• क्षयरोग तपासणी : ४,९७६• सिकल सेल तपासणी : ३,०९४• समुपदेशन लाभार्थी : ३१,०६६• एकूण लाभार्थी : १,२६,८४३तसेच, आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात ३,२१४ आयुष्मान भारत कार्ड, ५७० सिकल सेल कार्ड वितरित करण्यात आले आहेत. ६२७ नवीन निक्षय मित्र नोंदविण्यात आले आहेत.

मार्गदर्शक सूचना

• महिलांनी शिबिरांना जाताना आधार कार्ड किंवा आभा कार्ड बरोबर न्यावे.• ओळखपत्र नसले तरी महिलांना तपासणीचा लाभ घेता येईल.जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालये तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना संलग्न रुग्णालये व खाजगी वैद्यकीय संघटनांचा या अभियानात सक्रिय सहभाग आहे.

जास्तीत जास्त महिलांनी या शिबिरात सहभागी होऊन आपली संपूर्ण आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे

000000

संबंधित पोस्ट

यवतमाळ जिल्ह्यात 27 एप्रिल ते 19 मे 2026 दरम्यान विशेष कर्करोग निदान मोहीम…

जागतिक लोकसंख्या दिन : सुखी जीवनाचा उपाय लोकसंख्या वाढीवर मात .

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमआरोग्य अभियानांमध्ये सर्व घटकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी स्वामी,२४ ग्रामपंचायतींना रजत तर ३०४ ग्रामपंचायतींना कास्य पदक सन्मान..

शिरूर तालुक्यामध्ये पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत कारवाई; मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड

हत्तीरोग दुरीकरणासाठी भिवंडी तालुक्यात १० फेब्रुवारीपासून सार्वत्रिक औषधोपचार मोहीम… भिवंडी तालुक्यात हत्तीरोग निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ : जनजागृतीसाठी मोबाईल आरोग्य व्हॅनला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta

हज यात्रेकरुंचे लसीकरण व आरोग्य तपासणी