vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वच्छता ही सेवा’ अभियानामध्ये नवी मुंबईतील शिल्पाकृती झाल्या चकाचक

’स्वच्छता ही सेवा’ अभियानामध्ये नवी मुंबईतील शिल्पाकृती झाल्या चकाचक

 

          नवी मुंबई प्रतिनिधी-  स्वच्छ व सुंदर शहर ही नवी मुंबईची सर्वदूर ओळख असून यामध्ये चौकाचौकांमध्ये असलेल्या आकर्षक शिल्पाकृतींचे महत्वाचे योगदान आहे. ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या बहुतांशी शिल्पाकृती त्या परिसराची वैशिष्ट्ये लक्षात घेउुन लावण्यात आली असून, जसे की – शाळा, महाविद्यालय, ग्रंथालये याजवळ पुस्तके वाचणारी मुले तसेच खेळांच्या मैदानांच्या परिसरात खेळांचे विविध साहित्य अथवा खेळणारी मुले – अशाप्रकारे पूरक शिल्पाकृती बसवून त्या परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे, त्यासोबतच त्या परिसराची वैशिष्ट्य अधोरेखित होईल अशी शिल्पे बसविण्यात आली आहेत.

            केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 17 सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानास सुरूवात झाली असून 2 ऑक्टोबरपर्यंत अभियानाच्या पंधरवडा कालावधीत आयोजित करावयाच्या दैनंदिन उपक्रमांचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजन करण्यात आले आहे. त्यास अनुसरुन आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रात सार्वजनिक जागी असलेल्या शिल्पाकृतींची विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

            अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री. संजय शिंदे यांच्या वतीने मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे तसेच सर्व विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी व स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, उपस्वच्छता निरीक्षक यांच्या सहयोगातून स्वच्छताकर्मींच्या माध्यमातून सर्व विभागांमध्ये शिल्पाकृती स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. या मोहीमेमध्ये लोकसहभागही लाभला.

            ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत दररोज विविध प्रकारचे स्वच्छता विषयक उपक्रम व सफाई मित्रांसाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. त्याला नागरिकांचा उत्तम सहभाग लाभत असून 2 ऑक्टोबरपर्यंत आयोजित केल्या जाणा-या उपक्रमांमध्ये नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी होउुन नवी मुंबई शहर स्वच्छतेत आपले मौलिक योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

0000000

संबंधित पोस्ट

प्रसिद्धि पासून कोसो दूर राहणारा विश्वविख्यात चित्रकार वासुदेव संतु गायतोंडे…

vishwatmaklokswamivarta

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारी रोजी होणार मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरूवात

राज्य शासनाच्या सेवा नागरिकांना व्हॉट्सॲपवरही उपलब्ध करुन देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे येथे गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महाअधिवेशनाचा समारोप

कामात गती, पारदर्शकता ठेवत अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन काम करा – पालकमंत्री विखे पाटील-श्रीगोंद्यात ‘बिबट रेस्क्यू सेंटर’ व वनविभागाच्या जागेवर विकास प्रकल्प उभारण्याच्या सूचना..

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद लक्षवेधी सूचना :मुंबईतील अनधिकृत बांधकामांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी- उद्योग मंत्री उदय सामंत

संभाजी नगर प्रभाग क्रं.1 मधील रोडचे काम न करता कॉन्ट्रक्टरने उचले बिल-जिल्हाधिकारीकडे चौकशीची मागणी – डॉ.रामकृष्ण भोडोंने