vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

प्रसिद्धि पासून कोसो दूर राहणारा विश्वविख्यात चित्रकार वासुदेव संतु गायतोंडे…

प्रसिद्धि पासून कोसो दूर राहणारा विश्वविख्यात चित्रकार वासुदेव संतु गायतोंडे…

 

मुंबई प्रतिनिधी

       मुंबई- शेवटच्या श्वासांपर्यंत कलेची साधना करणारा, त्या कलेत रमणारा, सर्वस्व अर्पण करणारा, ज्याने कधी मी पणाचा आव आणला नाही, कधी बडेजावपणा केला नाही. काम हीच पूजा मानली. त्यामुळे कधी ही प्रसिद्धिचा हव्यास केला नाही. अशा चित्रकाराच्या एका चित्राने भारावून जाऊन त्यांनी जगलेल्या शेवटच्या श्वासापर्यंत जीवनाचा लेखाजोखा मांडला त्यांचा पाठपुरावा केला आणि त्या उत्तुंग व्यक्तीमत्वाची महती जगाला व्हावी, त्यांच्या त्यागाची, ज्ञानाची महती विद्यार्थ्यांना कळावी या उदात्त हेतूने प्रेरित होउन त्यांचे शिष्य सतिश नाईक आणि त्यांच्या मित्रांनी , सहकाऱ्यांनी

ह्या अवलियाची, एका जगविख्यात चित्रकाराची ओळख करून दिली तो महान चित्रकार अर्थात वासुदेव संतू गायतोंडे असे म्हटल्या शिवाय राहवत नाही. अशा चित्रकाराची आणि चित्रकलेविषयी केलेला हा छोटासा प्रपंच…

 चित्रकला ही मानवी भावभावनांना आणि विचारांना अभिव्यक्त करणारी एक सशक्त कला आहे. याच कलेच्या माध्यमातून वासुदेव संतु गायतोंडे यांनी जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कलेची महती जगभर पोहोचली असून, आता ती पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहे.अशी माहिती चिन्हांचे संस्थापक-संपादक सतीश नाईक व भाषांतरकार शांता गोखले यांनीमुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 या पत्रकार परिषदेला कार्यकारी संपादक विनिल बुरखे, समूह संपादक डॉ. मंजिरी ठाकूर उपस्थित होते.

  चिन्ह पब्लिकेशन्सने गायतोंडे यांचे पुस्तक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाच्या हिरवळीवर पद्मभूषण डॉ. नंदकिशोर लाड, पद्मश्री डॉ. सरयू दोशी, डॉ. फिरोजा गोदरेज, प्रयाग शुक्ला, पद्मश्री कुमार केतकर आणि अमोल पालेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात येणार आहे.  २००१ मध्ये निधन झालेले, भारतातील सर्वश्रेष्ठ कलाकारांपैकी एक असलेले वासुदेव संतु गायतोंडे यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित एका व्यापक ग्रंथाच्या प्रकाशनाची घोषणा चिन्ह पब्लिकेशन्सने केली आहे. गायतोंडे यांच्या जीवनाचे आणि कार्याचे स्मरण करण्यासाठी ‘चिन्ह’ मासिकाचे आणि ‘चिन्ह आर्ट न्यूज’ या वेबसाइटचे संस्थापक-संपादक सतीश नाईक यांनी मासिकाचा एक विशेष अंक प्रकाशित केला होता. या अंकात गायतोंड यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि जवळचे सहकारी यांनी लिहिलेले अनेक लेख होते.

 चिन्ह मासिकाचा हा अंक या महान कलाकारावरील सतीश नाईक यांचे स्वप्न असलेल्या व्यापक ग्रंथाच्या निर्मितीसाठी चालना देणारा ठरला. या एकांतप्रिय कलाकाराच्या कलेशी, त्याच्या कुटुंबाशी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गायतोंडे यांच्या नंतरच्या सर्व कामांवर ज्याचा प्रभाव पडला, अशा झेन बुद्धीझम आणि त्यांच्या अध्यात्मिक प्रवासावर प्रकाश टाकणाऱ्या साहित्याचा शोध घेण्यात नाईक यांनी अनेक महिने आणि वर्षे घालवली.असे डॉ मंजिरी ठाकूर यांनी सांगितले.

   गायतोंडे यांचे कला क्षेत्रातील असाधारण योगदान आणि महत्त्व लक्षात घेता, सतीश नाईक यांनी आणखी एक पाऊल पुढे जाऊन त्या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला, ज्याचा अनुवाद शांता गोखले यांनी केला. या इंग्रजी पुस्तकात १ लाखापेक्षा जास्त शब्द संख्येचे लेख, व मुलाखती, तसेच गायतोंडे यांनी काढलेली १२० चित्रे, या पुस्तकासाठी खास निर्माण केलेली गायतोंडे यांची २० पोर्ट्रेट्स आणि त्यांची ७४ दुर्मिळ छायाचित्रे आहेत.

  २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाच्या हिरवळीवर पद्मभूषण डॉ. नंदकिशोर लाड, पद्मश्री डॉ. सरयू दोशी, डॉ. फिरोजा गोदरेज, श्री. प्रयाग शुक्ला, पद्मश्री कुमार केतकर आणि श्री. अमोल पालेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन केले जाईल. चिन्ह पब्लिकेशन्सने हे पुस्तक २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनापर्यंत मर्यादित कालावधीसाठी प्रकाशनपूर्व सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले आहे. हे पुस्तक कलाप्रेमी व कलासंग्राहकांसाठी एक महत्त्वाचा संदर्भ आणि संग्रहणीय पुस्तक, तर तरुण कलाकारांसाठी प्रेरणास्रोत ठरणार आहे असे विनिल बुरखे यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

संगमनेर येथील ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीत अमरावतीची बाजी,विजेत्यांच्या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते सत्कार चार विजेत्यांनी उंचावला जिल्ह्याचा नावलौकिक…

vishwatmaklokswamivarta

सामाजिक ऋण चुकविण्याचा रायगड डाक विभागाचा अनोखा पायंडा

रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान पोष्टरचे जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते विमोचन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (#विजाभज), इतर मागास वर्ग (#इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (#विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी मॅट्रिकपूर्व #शिष्यवृत्ती

vishwatmaklokswamivarta

मुस्लिम औरंगजेबाची नव्हे, आपलीच अवलाद – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* मीरा रोडमधील बकरी ईद वादावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे वक्तव्य*