vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईकरांनो घराबाहेर पडत असाल तर ठाण्याकडील प्रवास टाळाच; कारण…

मुंबईकरांनो  घराबाहेर पडत असाल तर ठाण्याकडील प्रवास टाळाच; कारण…

 

मुंबई प्रतिनिधी: मध्य, पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी (23 फेब्रुवारी) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतुकीलाही मेगाब्लॉकचा फटका बसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या कालावधीमध्ये मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा, धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे मुख्य मार्गावर असा असेल मेगाब्लॉक कुठे : ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर धावतील.

कधी : सकाळी 10.40 वाजल्यापासून दुपारी 3.40 वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल असणार आहे.परिणाम : ब्लाॅक कालावधीत ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा, धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

ट्रान्सहार्बर मार्गावर असा असेल मेगाब्लॉककुठे : ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर धावतील कधी : सकाळी 11.10 वाजल्यापासून दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक काळातील वेळापत्रकानुसार धावतील.

परिणाम : ब्लाॅक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ/पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर असा असेल मेगाब्लॉक कुठे : सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. कधी : सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा, धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

ठाण्यातून प्रवास टाळलेला बरा-एकंदरित 23 फेब्रुवारीचं रेल्वेचं नियोजन पाहिल्यास मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ठाणे स्थानकामधून प्रवास टाळणं अधिक सोयीचं ठरणार आहे. या स्थानकामध्ये दोन्ही मार्गांवरील मेगाब्लॉकचा परिणाम होणार असल्याने प्रवासामध्ये हाल होऊ शकतात अशी चिन्हं दिसत आहेत.

संबंधित पोस्ट

शासनाच्या १०२७ सेवा १५ ऑगस्टपासूनएकाच पोर्टलवरून- संजय काटकर

जालना येथे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खरीप 2025 विमा साठी बेमुदत मुक्काम ठोको आंदोलन 

अग्निवीर भरतीसाठी जिल्ह्यात सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे१० ते १२ ऑगस्टदरम्यान आयोजन; इच्छुक युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन

उपमुख्यमंत्री कार्यालय (जनसंपर्क कक्ष)मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प,सामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा; ग्लोबल मुंबईचा शुभारंभ- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात” 347 उमेदवारांची प्राथमिक निवड

पक्षकारांच्या न्यायासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करावे -न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे जुन्नर येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीचा विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta