vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शासनाच्या १०२७ सेवा १५ ऑगस्टपासूनएकाच पोर्टलवरून- संजय काटकर

शासनाच्या १०२७ सेवा १५ ऑगस्टपासूनएकाच पोर्टलवरून- संजय काटकर

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- राज्यशासनामार्फत दिल्या जाणाऱ्या १०२७ अधिसूचित सेवा ह्या ऑनलाईन दिल्या जातात. ह्या सर्व सेवा ह्या वेगवेगळ्या विभागांच्या व वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन दिल्या जातात. ह्या सर्व सेवा ह्या १५ ऑगस्टपासून एकाच पोर्टलवरुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे,अशी माहिती महा आयटीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी आज येथे दिली.

महा-आयटीमार्फत शासनाच्या सेवा नागरिकांना ऑनलाईन उपलब्धतेच्या अनुषंगाने स्थानिक आपले सेवा केंद्र चालकांच्या भेटी घेणे व स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेणे यासाठी आज श्री. काटकर जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. जिल्ह्यातील आपले सेवा केंद्र चालकांची बैठक जिल्हा नियोजन सभागृहात घेऊन श्री. काटकर यांनी मार्गदर्शन केले. अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, प्रकल्प संचालक शरद दिवेकर हे ही यावेळी उपस्थित होते.

त्यांनी सांगितले की, सेवा अधिनियमाअंतर्गत शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या ह्या सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याचे शासनाचे प्रयत्न सुरु असून त्यात १३८ सेवा ह्या ३१ मे पर्यंत एकत्रीत केल्या जाणार असून त्यापैकी ९२ सेवा एकत्रित केल्या आहेत. तर ३०६ सेवा ह्या ऑफलाईन दिल्या जातात त्याही ऑनलाईन करण्यासाठ प्रयत्न होत आहेत. अशा प्रकारे सर्व १०२७ सेवा १५ ऑगस्ट पर्यंत नागरिकांना देता येतील असे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले. या सेवा पुरवितांना सेवा केंद्र चालकांच्या अडचणी जाणून घेणे, येथे अधिक काम असते तेथे पाच लॉग ईन देणे, भूकेंद्रीत सेवा देणे, याबाबत माहिती घेण्यात येत आहे. जिल्ह्यात १०९४ सेवा केंद्र असून या सेवा केंद्रांवर सेवांचे दर प्रदर्शित करणे, क्यू आर कोड वर तक्रार दाखल करता येणे, भुस्थिर सेवा देणे इ. सुधारणा करण्यात येत असल्याचेही श्री.काटकर यांनी सांगितले. या सेवांची माहिती लोकांना मिळावी म्हणून व्हॉटसअप वरुन चॅट्बोट सुविधा नजिकच्या काळात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

०००००

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरपालिके चे आवाहन- पाइपलाइन कामासाठी- 30 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. बुधवार, 5 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11 वाजता शटडाउन सुरू होईल आणि गुरुवार, 6 फेब्रुवारी, 2025, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील

vishwatmaklokswamivarta

सेवाकर्मी पुरस्कार” कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणेची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यालयांमध्ये स्थान – १०० पैकी ८० गुणांकन…

vishwatmaklokswamivarta

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार   * निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध..

खर्डा गावातील मदारी वसाहतींचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावे- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी – ईडीची मोठी कारवाई! रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांवर फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 35 ठिकाणी छापे.

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर – पैठण महामार्गाच्या कामाला गती;अपूर्ण कामे लवकरच पूर्ण करणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले