vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संभाजी नगर प्रभाग क्रं.1 मधील रोडचे काम न करता कॉन्ट्रक्टरने उचले बिल-जिल्हाधिकारीकडे चौकशीची मागणी – डॉ.रामकृष्ण भोडोंने

संभाजी नगर प्रभाग क्रं.1 मधील रोडचे काम न करता कॉन्ट्रक्टरने उचले बिल-जिल्हाधिकारीकडे चौकशीची मागणी – डॉ.रामकृष्ण भोडोंने

 

जालना । प्रतिनिधी – प्रभाग क्रं.1 मधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरीदलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जालना महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रं.1 मधील सुरेश कांबळे यांच्या घरापासून ते दिलीप चौधरी यांच्या घरापर्यंत ट्रिमिक्स रस्ता तयार करणे बाबत संबंधित कॉन्ट्रॅक्टरला 2018पासून वर्कऑर्डर मिळालेली आहे. सदरील कामाचा कालावधी आठ वर्षे होऊनही सदरील रोडचे काम करण्यात आलेली नाही. सदरील काम न करता संबंधित कॉन्ट्रॅक्टरने सदरील रोडची कामाची बिले उचलली आहे. याची उच्च स्तरीय.चौकशी करून संबंधित कॉन्ट्रॅक्टर व संबंधित अधिकार्‍याविरूद्ध कार्यवाही करून सदरील रोडचे काम 15 दिवसात सुरू करण्यात यावे नसता उपोषण करण्यात येईल असा इशारा असे निवेदन जिल्हाधिकारी जालना यांना समाजसेवक डॉ.रामकृष्ण भोडोंने यांनी दि.20/05/2025 रोजी दिले आहे. जिल्हाधिकारी यांनी चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील दिपक इंगोले साहेब यांनी सुद्धा 2 दिवसात महानगरपालिकेला पत्र देवून कार्यवाही

करण्यात येईल असे आश्‍वासन दिले. डॉ.भोडोंने यांनी निवेदनात म्हटले आहे की, याबाबत आम्ही महानगरपालिका, जालना कार्यालयासमोर तीन वेळा साल सन 2022, 2024, आणि 2025 साली आमरण उपोषण केले. याबाबत आम्ही अनेक वेळा निवेदने सुद्धा दिली. तसेच संबंधित कर्मचार्‍यांना सुद्धा विनंती केली. त्यांना फोनवर सुद्धा संपर्क साधला.महानगरपालिकेचे इंजिनिअर साऊद यांनी 2025 मध्ये रोडचे स्थळ पाहणी करूनगेले. काम झाले नाही असे आयुक्त साहेबांना सांगितले. मग रोडचे काम झालेनसतांना, सदरील कामांचे बिल कॉन्ट्रक्टरला कसे काय दिले? सदरील काम 6महिन्याच्या आत पूर्ण व्हायला हवे होते, परंतु तसे न होता 8 वर्षांपासूनसदरील काम पूर्ण झाले नाही. सदरील काम 6 महिन्यात न केल्यासकॉन्ट्रॅक्रला 300/- रोज दंडाची तरतूद आहे. सदरील कॉन्ट्रॅक्टरला नोटीसका देण्यात आलेली नाही. सदरील कॉन्ट्रक्टरचे लायसन्स का रद्द केले नाहीअसेही निवेदनात म्हटले आहे. 15 दिवसात जर रोडचे काम चालु झाले नाही तरआमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येईल असा इशाराही

त्यांनी दिला

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकाऱ्यांकडून कारागृहाची पाहणी*कारागृह अभिविक्षक मंडळाची बैठक संपन्न

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 35 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र

vishwatmaklokswamivarta

पुणे येथील यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर वाहतूक तात्पुरती बंद

मराठवाड्यातील क्रीडा संकुले आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी पाठपुरावा करा – विभागीय आयुक्त जी. श्रीकां दर सोमवारीक्रीडा संकुल परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त समता परिषदेच्या सैनिकांना निवडून द्या – ऍड. सुभाष राऊत-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक संपन्न