vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पुणे येथील यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर वाहतूक तात्पुरती बंद

पुणे येथील यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर वाहतूक तात्पुरती बंद

पुणे प्रतिनिधी-यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग वरील कि.मी. क्र. ५८/५०० (डोंगरगाव / कुसगाव) येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढणे व रंगकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबईकडे जाणारी वाहतूक २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, सर्व वाहने किवळे – देहूरोड – तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून कुसगाव टोल प्लाझा येथे वळविण्यात येतीलतसेच, पुण्याकडे येणारी वाहतूक दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, सर्व वाहने कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून देहू रोड – किवळे मार्गे पुण्याकडे वळविण्यात येतील. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी प्रवासाचे योग्य नियोजन करावे व दिलेल्या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा

दरम्यान, या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांनकोणतीही अडचण आल्यास त्यांनी मदतीसाठी नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 9822498224 किंवा महामार्ग पोलीस विभागाचा 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

राज्यपालांच्या हस्ते लोकभवनात इतिहास व अभिलेख दालनाचे उद्‌घाटन दालनात १५० वर्षांमधील निवडक छायाचित्रे व दस्तावेजांचे प्रदर्शन

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड . निलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट…

गडचिरोली पोलिसांची अवैध कोंबडा झुंज आणि जुगाराविरुद्ध मोठी कारवाई

vishwatmaklokswamivarta

पावसामुळे सिंचन विहिरी कोसळल्याने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या -विविध मागण्यांचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे केंद्रीय कृषी कृषीआणि किसान कल्याण मंत्र्यांना निवेदन उपतालुकाप्रमुख ठोंबरेंनी दिले दिल्लीला जावून कृषी मंत्र्यांना निवेदन

खडकुत ते जांभरुन फाटापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लगतच्या एकेरी मार्गाने …

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातअनधिकृत भूखंड, बांधकाम नियमित होणार- महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडेसर्वेक्षण पथकास सहकार्य करण्याबाबत महानगर आयुक्तांच्या तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचना…