vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

उंच गणेशमूर्तींसाठी खोल कृत्रिम तलाव उभारण्याचे आदेश

 उंच गणेशमूर्तींसाठी खोल कृत्रिम तलाव उभारण्याचे आदेश

राज्य प्रतिनिधी-

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता, त्या मूर्तींसाठी खोल आणि सुरक्षित कृत्रिम तलाव उभारणे शक्य आहे का, असा थेट प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे.

मुंबईतील महत्त्वाच्या सुनावणीत राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, पाच फूट उंचीपर्यंतच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावांमध्येच विसर्जित करण्यात येतील. तर पाच फूटांहून अधिक उंचीच्या मूर्तींचे विसर्जन मात्र नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याची परवानगी दिली जाईल. तथापि, अशा मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळत नाहीत, म्हणून दुसऱ्या दिवशी महापालिकेकडून त्या पाण्यातून बाहेर काढण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत सुमारे एक लाख नव्वद हजारांहून अधिक मूर्ती पाच फूटांहून कमी उंचीच्या आहेत, तर सात हजारांहून अधिक मूर्ती पाच फूटांपेक्षा जास्त उंचीच्या आहेत.

: मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने विचारणा केली की, “सात ते आठ फूट उंचीच्या मूर्तींसाठी खोल आणि सुरक्षित कृत्रिम तलाव उभारणे शक्य आहे का?” याबाबत त्यांनी राज्य सरकारकडून स्पष्टता मागितली. नैसर्गिक जलस्रोतांवरील ताण आणि पर्यावरणीय परिणाम लक्षात घेता ही शक्यता तपासण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

सराफ यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, “जर प्रत्येक मूर्तीकरिता स्वतंत्र कृत्रिम तलाव उभारावा लागला, तर त्यात वेळ आणि जागेचा मोठा प्रश्न निर्माण होईल.” त्यांनी आकडेवारी सादर करताना सांगितले की, सुमारे ३८६९ मूर्ती पाच ते दहा फूट उंचीच्या आहेत आणि सुमारे ३९०० मूर्ती दहा फूटांहून अधिक उंचीच्या आहेत.

याच प्रकरणी ठाण्याचे रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनीही जनहित याचिका दाखल केली आहे. त्यांनी मागणी केली आहे की, केंद्र सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून पीओपी मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन थांबवले जावे आणि त्यासाठी राज्य सरकार, महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत.

संबंधित पोस्ट

अतिवृष्टी व पूर आपत्ती बाधितांना विशेष मदत पॅकेज, सवलती लागू बुलढाणा जिल्ह्यातील ९ तालुक्यांचा समावेश  शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करावी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षे साठी पात्र उमेदवारांना पूर्व तयारी करण्याचे आवाहन

जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान कर्करोग तपासणी मोहीम कॅन्सर व्हॅनद्वारे होणार मोफत तपासणी

न्यायालये केवळ इमारती नसून लोकशाही मूल्यांचे प्रतीक – सरन्यायाधीश भूषण गवई वांद्रे पूर्व येथे उच्च न्यायालय संकुलाची पायाभरणी व कोनशीलेचे अनावरण

vishwatmaklokswamivarta

महिला शेतकरी गटांना कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी अर्ज करण्यास 25 एप्रिलपर्यत मुदतवाढ

 रील शूट करताना धडक, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू,