शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणाऱ्या“डिजिटल व्हॅन” उपक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्घाटन संपन्न
ठाणे, प्रतिनिधी:- जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे व जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांच्या पुढाकारातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रचार-प्रसिद्धी विविध माध्यमांद्वारे सुरु करण्यात आली आहे.
त्यानुषंगाने ठाणे जिल्हा माहिती कार्यालयामार्फत डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून पुढील काही दिवस संपूर्ण जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी व सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (झोपडपट्टी पूनर्वसन प्राधिकरण) अमित शेडगे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, सहाय्यक महसूल अधिकारी हरिश देसले तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.प्रदर्शन, डिजिटल वॉलद्वारे प्रसिद्धी, क्यू आर कोड, शासकीय योजना चित्रफिती व सोशल मिडीया प्रसिद्धी, व्हिडिओ क्रिएटिव्ह, जिल्ह्यातील तलावांवरील चित्रफिती, मोबाईल स्टॅन्डद्वारे प्रसिद्धी, मोबाईल व्हॅन, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांची सोशल मिडियाद्वारे प्रसिद्धी अशा विविध माध्यमांद्वारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रचार-प्रसिद्धी करण्यात येत असून जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.00000