vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (#विजाभज), इतर मागास वर्ग (#इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (#विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी मॅट्रिकपूर्व #शिष्यवृत्ती

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती -विजाभज), इतर मागास वर्ग -इमाव आणि विशेष मागास प्रवर्ग विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती..

राज्य प्रतिनिधी –

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (#विजाभज), इतर मागास वर्ग (#इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (#विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी मॅट्रिकपूर्व #शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने #महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत. या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळांनी महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक नोंदणी व माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन मुंबई शहर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक रविकिरण पाटील यांनी केले आहे.

 या योजनेसाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी महाडीबीटी पोर्टलवरील https://prematric.mahait.org/Login/Login लॉगिनद्वारे शाळेची नोंदणी करणे आवश्यक आहे. प्री-मॅट्रिक योजनांसाठी अर्ज नोंदणी करताना मुख्याध्यापकांनी Pre_SE27XXXXXXXXX_Principal हा युजर आयडी व Pass@123 हा पासवर्ड वापरून लॉगिन करावे. त्यानंतर शाळेचे प्रोफाइल, मुख्याध्यापक व लिपिकांची माहिती तसेच विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी.

विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहेत, त्या संबंधित शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रियेदरम्यान काही अडचणी उद्भवल्यास संबंधितांनी लेखी स्वरूपात कळवावे अथवा astdirmumcityvint@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.

संबंधित पोस्ट

पलूसच्या जवाहर नवोदय विद्यालयात 11 वी प्रवेशासाठी 10 ऑगस्टची मुदत..

न्याय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन

सरकार ऑनलाइन गेमिंग नियम २०२५ च्या प्रचार आणि नियमावलीवर नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. याबाबतची माहिती

महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये,लवकरात लवकर लागू करावेत कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी गुन्हे नोंदवले जाणे आवश्यक,एफआयआर दाखल करण्यात विलंब होता कामा नये सात वर्षांहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त दोषसिद्धी दर मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

vishwatmaklokswamivarta

सहकार पुरस्कारासाठी जिल्ह्यातील इच्छूक संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत

रुग्णवाहिका सेवेच्या गुणवत्ता मानकांसाठी ‘बीव्हीजी’च्या सहकार्याने देशातील पहिलाच मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न