vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सहकार पुरस्कारासाठी जिल्ह्यातील इच्छूक संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत

सहकार पुरस्कारासाठी जिल्ह्यातील इच्छूक संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत

रायगड( प्रतिनिधी:- राज्याच्या सहकार चळवळीमध्ये उत्कृष्ट योगदान दिलेल्या राज्यातील सहकारी संस्थांना शासनामार्फत सहकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणी झालेल्या इच्छूक सहकारी संस्थांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव कालबध्द कार्यक्रमानुसार दि.02/07/2025 ते 18/08/2025 या मुदतीत संबंधीत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, रायगड-अलिबाग प्र.का.जगताप यांनी केले आहे.

सन 2023-24 या आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारावर “सहकार महर्षी” पुरस्कार 1, “सहकार भुषण” पुरस्कार 21 व “सहकार निष्ठ ” पुरस्कार 23 याप्रमाणे सहकार पुरस्कारासाठी संस्थांची निवड करण्यात येणार आहे.

सर्व सहकारी संस्थांच्या पुरस्कारासाठीचे निकष व गुणांचा तपशिल याची सविस्तर माहीती सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच या कार्यालयात उपलब्ध आहेत.

0

संबंधित पोस्ट

सशस्त्र दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; नाशिक येथे मोफत पूर्व प्रशिक्षण

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; पुणे रिंगरोडच्या पूर्व विस्तारीकरणामुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्ग १३ आणि पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणास पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता

पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे पूर्ण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

राष्ट्रीय लोक अदालतीस पक्षकारांचा चांगला प्रतिसाद

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गोदावरी पात्रातील अवैध #वाळू उत्खननावर मध्यरात्री छापा; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त*

नाशिक जिल्ह्यात ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी जमीनीचा प्रस्ताव सादर करा- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta