vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय लोक अदालतीस पक्षकारांचा चांगला प्रतिसाद

राष्ट्रीय लोक अदालतीस पक्षकारांचा चांगला प्रतिसाद

सातारा प्रतिनिधी: राष्ट्रीय लोक अदालतीचे 14 मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये संपूर्ण जिल्हयात एकूण १९,०७८ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी प्रलंबित प्रकरणे २,२०३ तडजोडीने निकाली निघाली. त्यामध्ये एकूण रु. २५,७०,३७,६२०/- रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच वादपूर्व १३,८४८ प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी तडजोडीने २,२२६ प्रकरणे निकाली निघाली. वादपूर्व प्रकरणामध्ये एकूण २,६०,३४,८६२/- एवढी रक्कम वसूल करण्यात आली.

लोकअदालतीमध्ये एकूण ४,४२९ प्रकरणे निकाली निघाली. दि. ०९ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ या कालावधीमधील स्पेशल ड्राईव्ह मध्ये सातारा जिल्हयामध्ये एकूण ७११ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वैवाहिक वाद, तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी केसेस, भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कर्ज, धनादेश न वठल्याची प्रकरणे इत्यादींचा समावेश आहे. वादपूर्व प्रकरणात फायनान्स कंपन्या, बँकांची कर्ज, दूरध्वनी व विद्युत देयके आणि ग्रामपंचायत, मालमत्ता पाणीपट्टी कर वसुली प्रकरणे इ. प्रकरणांचा समावेश होता.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार अपघात प्रकरणामध्ये दुखापतीमुळे वादी हे न्यायालयाच्या पायऱ्या चढण्यासाठी असमर्थ होती. तेव्हा पॅनेल प्रमुख श्री.ए.एम. शेटे जिल्हा न्यायाधीश १ व सदस्य यांनी न्यायलयाच्या दाराजवळ थांबलेल्या गाडीजवळ जाऊन पक्षकारांची तडजोड घडवून आणली व प्रकरणात र.रू.५,५०,०००/- देण्याचे मंजुर झाले.

तसेच या राष्ट्रीय लोकअदालतीलमध्ये स्पेशल मोटार अपघात दावा क. १०९/२०२१ मध्ये पक्षकारांची तडजोड घडवून आणली व प्रकरणात र.रू. ३२,००,०००/- (अक्षरी र.रू. बत्तीस लाख फक्त) प्रतिवादी यांचेकडून स्वीकारून प्रकरण निकाली काढण्यात आले.

जिल्हयाचे ठिकाणी एकूण ९ आणि तालुका न्यायालयात एकूण २८ पॅनेल करण्यात आले होते. पॅनेल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश क. स्तर, यांनी काम पाहिले. प्रत्येक पॅनलवर एक विधिज्ञ पॅनल सदस्य म्हणून काम पाहत होते. लोक अदालत यशस्वी होण्याकरिता पक्षकार, विधिज्ञ, सर्व न्यायीक अधिकारी, पोलीस, विधी स्वयंसेवक आणि सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

राष्ट्रीय लोक अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून भविष्यात आणखी प्रबोधन आणि प्रयत्न करणार असल्याचे प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्रीमती. निना बेदरकर यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

एफएसएसएआयचा उपक्रम; खाद्य पदार्थ विक्रेत्यांसाठी एक दिवशीय प्रशिक्षण-केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (#विजाभज), इतर मागास वर्ग (#इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (#विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी मॅट्रिकपूर्व #शिष्यवृत्ती

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खास मुलाखतीत स्पष्ट केलं की, मुंबईचा पुढील महापौर महाराष्ट्रातील महायुतीचाच असेल आणि तो हिंदू व मराठीच …

जिल्ह्यातील मतमोजणीची तालुकानिहाय ठिकाणे निश्चित

vishwatmaklokswamivarta

अभिजात मराठी भाषा सप्ताहः विश्वकोश मंडळातर्फे भूविज्ञान नोंद लेखन कार्यशाळा,जनसामान्यांना पृथ्वीविषयी सोप्या भाषेत माहिती द्या-डॉ.मिलिंद दुसाने