vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नाशिक जिल्ह्यात ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी जमीनीचा प्रस्ताव सादर करा- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक जिल्ह्यात ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी जमीनीचा प्रस्ताव सादर करा- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, प्रतिनिधी : ग्रामीण आणि विशेषत: आदिवासी भागामध्ये उद्योगक्षेत्र वाढावे, आदिवासी समाजातील उद्योजकांना व्यवसाय वृद्धीसाठी प्रोत्साहन मिळावे, यादृष्टीने ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (एमआयडीसी) जमीन हस्तांतरीत करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर विकसित करण्यासाठी शासकीय जमीन एमआयडीसीला हस्तांतरीत करण्याबाबत श्री.बावनकुळे यांच्या मंत्रालयीन दालनात बैठक झाली. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, उद्योग विभागाचे सचिव डॉ.पी.अन्बलगन, एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी ग्रामीण आणि आदिवासी भागात औद्योगिक विकास होणे आवश्यक असल्याचे सांगून जांबुटके येथे मोफत जमीन देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा, तसेच येथे आदिवासी समाजातील उद्योजकांना 50 टक्के प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश यावेळी निदर्श देण्यात आले

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत 7 कोटी 94 लाख रुपयांची रक्कम वसूल…

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषेचे वैभव जोपासण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे- ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा; – अभिजात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

शिर्डी औद्योगिक वसाहतीत स्थानिक युवकांना रोजगारास प्राधान्य – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत शिर्डी एमआयडीसीत ३ हजार स्थानिक युवकांना रोजगार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील मृत पावलेल्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांना डोंबिवलीत हजारो शोकाकुल नागरिकांनी भगशाला मैदानात एकत्रित येत अश्रूंच्या साक्षीने अखेरचा निरोप दिला.  

रविवारी साता-यात हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल..

vishwatmaklokswamivarta

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडून वडाळी तलाव परिसराची पाहणी