vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

न्याय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन

न्याय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- मा.मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड राजेंद्र सावंत, यांच्या मार्गदर्शनाखाली “न्याय आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.02 मार्च ते दि.30 मार्च 2026 या कालावधीत संपूर्ण रायगड जिल्ह्यात फिरते लोक अदालत कार्यरत राहणार असून विविध तालुक्यांमध्ये जाऊन प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा तसेच नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ दि. 02 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता रायगड जिल्हा न्यायालय, अलिबाग येथे एस. आर. तिवारी, जिल्हा न्यायाधीश-2 यांच्या हस्ते संपन्न झाला.

या फिरत्या लोक अदालतीसाठी श्रीकांत उपाध्ये (निवृत्त न्यायाधीश) यांची कक्ष न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा न्यायाधीश 3 रायगड अलिबाग एस.डी. भगत तसेच न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग श्रीमती तेजस्विनी निराळे तसेच अलिबाग वकील संघटनेचे अध्यक्ष प्रसाद पाटील, उपाध्यक्ष ए.डी.पाटील व सचिव अमित देशमुख आणि सर्व न्यायिक अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग उपस्थित होते

ही फिरती लोक अदालत दि. 30 मार्च 2026 पर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जाऊन लोक अदालत आयोजित करणार असून नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग राजेंद्र द.सावंत यांनी केले आहे. न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिकांना जलद सुलभ व विनामूल्य न्याय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देश या उपक्रमामध्ये आहे.

0000000

संबंधित पोस्ट

वाशिम वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘संत सेवालाल महाराज’ नामकरण

रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र” 2026 अतंर्गत आयोजीत रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जालना येथे 29 सप्टेंबरला रोजगार महाकुंभ; युवकांना रोजगाराच्या संधी…

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात १७ मे ते ३ जून दरम्यान ड्रोन आणि अन्य हवाई उपकरणांवर बंदी-जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश जारी

जालन्यात प्रथमच बुद्धिबळ स्पर्धेचे रंगतदार आयोजन!जालना गणेश फेस्टिव्हल तर्फे खुली, 15 व 10 वर्षाखालील गटांत स्पर्धा – विजेत्यांना रोख पारितोषिके व ट्रॉफी

प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा; जिल्ह्यातील यंत्रणा प्रमुखांचे  प्रशिक्षण नियोजन व मूल्यमापनासाठी प्रशिक्षण आवश्यक- विभागीय आयुक्त दिलीप गावडे

vishwatmaklokswamivarta

लहान मासे पकडून खरेदी विक्री केल्यास दंडात्मक कारवाई