vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील बोरिवली येथे “ऋषभायन-२” वैश्विक सांस्कृतिक आणि वैदिक ज्ञान महोत्सवाचे ‘वृषभ कला’ प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

मुंबईतील बोरिवली येथे “ऋषभायन-२” वैश्विक सांस्कृतिक आणि वैदिक ज्ञान महोत्सवाचे ‘वृषभ कला’ प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

राज्य प्रतिनिधी मुंबईतील बोरिवली येथे “ऋषभायन-२” वैश्विक सांस्कृतिक आणि वैदिक ज्ञान महोत्सवाचे ‘वृषभ कला’ प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ऋषभायन-२ या आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्ताने ‘ऋषभयन’ या संकल्पनेतून साकार झालेल्या ११११ ग्रंथांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

ज्ञान, साधना, सुरक्षा आणि कृषी याबाबत महत्वपूर्ण विचारांदवारे साहित्य, कला, संस्कृती आणि सभ्यता प्रगल्भ करणारा “असी, मसी और कृषी” चा जीवनमार्ग भगवान वृषभदेव यांनी दाखविला. जगाच्या कल्याणासाठी हे विचार व ज्ञान येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश असून भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक म्हणजे ऋषभदेवांचे विचार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भगवान ऋषभदेवांसाठी एक जागतिक दर्जाचे, योग्य व समर्पित स्थान निर्माण करण्याबाबत चर्चा करण्यात येईल आणि त्यांनी दिलेले ज्ञान, कला, आणि सांस्कृतिक मूल्ये एकत्रितपणे जगासमोर मांडण्यासाठी शासनाच्या वतीने जागा देण्यात येईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. जैन मुनी यांनी या कार्यासाठी येथे जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी केली होती.

यावेळी राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा,आमदार संजय उपाध्याय, आमदार मनीषा चौधरी, माजी खासदार गोपाळ शेट्टी, एल.पी. सिंह, ललित गांधी तसेच जैन मुनी, शिख, बौध्द आणि हिंदू धर्मगुरू देखील यावेळी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

विषमता मिटवून दलित सवर्णांना जोडण्याचे* *डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा*

सांगली जिल्ह्यात 4 कोटी 80 लाखांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा- सद्यस्थितीत एक टँकर, 7 विहिरींद्वारे पाणीपुरवठा – मागणी व आवश्यकतेनुसार नियोजन 

सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासन व ‘सीईजीआयएस’ यांच्यात सामंजस्य करार

एकल महिला धोरण कार्यशाळेस उस्फूर्त प्रतिसाद

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी पं.दिनदयाल उपाध्याय योजनेचा लाभ घेण्याच्या योजनेस मुदतवाढ

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ऑनलाईन नोंदणीला सुरुवात…

vishwatmaklokswamivarta