vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एकल महिला धोरण कार्यशाळेस उस्फूर्त प्रतिसाद

एकल महिला धोरण कार्यशाळेस उस्फूर्त प्रतिसाद

 

रायगड – प्रतिनिधी: महिला व बाल विकास विभागाच्या वतीने एकल महिला धोरण तयार करण्याच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय कार्यशाळा, राजस्व सभागृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली. एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व कायदेशीर सक्षमीकरणासाठी राज्यस्तरीय धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेत विविध स्तरांवरील सूचना व अभिप्राय प्राप्त करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीम. निर्मला कुचिक यांनी प्रास्ताविक सादर करून कार्यशाळेची भूमिका, उद्दिष्टे व एकल महिला धोरणाची आवश्यकता याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेमध्ये एकूण १८ स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, अनेक सामाजिक कार्यकर्ते, विविध कार्यालयातील शासकीय अधिकारी तसेच एकल महिलांच्या संदर्भात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी सक्रिय सहभाग नोंदविला. एकल महिलांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा, सामाजिक सुरक्षा, कायदेशीर संरक्षण व आर्थिक स्वावलंबन यांसंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सहभागी प्रतिनिधींनी धोरण अधिक प्रभावी, सर्वसमावेशक करण्यासाठी मौल्यवान सूचना मांडल्या.

यावेळी अनेक स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले लेखी अभिप्राय व सूचना विभागाकडे सादर केले. प्राप्त सूचना व अभिप्रायांचा विचार करून राज्यस्तरीय धोरण निर्मिती प्रक्रियेस अधिक बळकटी मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीम. सुहिता ओव्हाळ यांनी उपस्थित मान्यवर, विविध संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व सहभागी यांचे आभार मानले. सर्व घटकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली.

संबंधित पोस्ट

सन २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २१ फेब्रुवारी२०२५ व बारावी बोर्ड परीक्षा ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी सुरू होणार आहे कॉपीमुक्त परीक्षा’ पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज…

vishwatmaklokswamivarta

बांधकामे, गार्डन, स्टेडियम, इन्स्टिट्युट येथे प्रक्रियाकृत पाण्याचाच वापर करावा – नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे

प्रलंबित महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’

विश्वास नांगरे पाटील यांनी छावा चित्रपटावर ही प्रतिक्रिया दिली आहे जी सोशल मीडियावर व्हायरल

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईतील ओल्या कच-यापासून निर्माण होणा-या खताला लाभला राज्य नोंदणीकृत “हरित महासिटी कंपोस्ट” ब्रँड नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाला नवी मानांकित ओळख

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 14 ठिकाणी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्यांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta