vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बीड जिल्ह्याचे सरपंच: संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल…

बीड जिल्ह्याचे सरपंच: संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल…

 

राज्य प्रतिनिधी-

बीड जिल्ह्याचे सरपंच: संतोष देशमुख हत्याप्रकरणात आज 8जणांना मोक्का लागला आहे. राहिलेला आठवा सुद्धा मोक्यात गेला पाहिजे. त्याच्यावर सुद्धा 302 झाला पाहिजे. यामध्ये सुद्धा आका आहे. तोच मेन असल्याचा हल्लाबोल भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. वरच्या आकाने 19 ऑक्टोबरला स्वत: सातपुडा बंगल्यावर बैठक घेतली. तो यामध्ये आरोपी का नाही? असा सवाल धसांनी केला. दीड़ कोटीसाठी संतोष देशमुखांची हत्या केली आहे. वाल्याकाका दीड नाहीतर संतोषसाठी आम्ही 3 कोटी गोळा करुन दिले असते असेही धस म्हणाले. 

 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी सुरेश धस बोलत होते. राजुरीत जामखेड नावाचं गाव आहे. तिथं एक अपघात झाला. यावेळी गाडीच्या चाकखाली कुत्रा मेला आम्ही गाडीत बसणाऱ्या सर्वांना वाईट वाटलं. पण संतोषला कुठल्या पद्धतीने मारलं. मारताना तो पाणी मागत होता पण त्याला पाणी दिलं नाही असे सुरेश धस म्हणाले. धाय मोकलून रडणाऱ्या माणसाच्या व्हिडिओ काढला आणि आकाला दाखवल्याचे धस म्हणाले. तुम्ही 100 लोकात मारुन त्याला घरी पाठवल्याचे सुरेश धस म्हणाले. तुमच्याकडे पैसा आणि माज आलाय असेही धस म्हणाले.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमआरोग्य अभियानांमध्ये सर्व घटकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी स्वामी,२४ ग्रामपंचायतींना रजत तर ३०४ ग्रामपंचायतींना कास्य पदक सन्मान..

प्रत्येक शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण विभाग आढावा बैठकीत पिंक शाळा, शिष्यवृत्ती, शिक्षक समायोजन आदी विषयांवर सखोल चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वनोपज आधारित उद्योग निर्मिती उपक्रम प्रदर्शनाचे आयोजन कांदळवन क्षेत्रात पर्यटन विकासाचे नियोजन-वनमंत्री गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta

मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे*भारताचा वेग आणि विकास अधोरेखित- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी आणि विकसित भारताच्या दिशेने मजबूत पाऊल…

जलजीवन मिशन प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्णत्वास न्यावी-अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

महाराष्ट्र राज्यात नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta