vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यातील नव वर्ष स्वागत यात्रेत जिल्हा परिषदेच्या चित्ररथास उत्स्फूर्त प्रतिसाद…

ठाणे जिल्ह्यातील नव वर्ष स्वागत यात्रेत जिल्हा परिषदेच्या चित्ररथास उत्स्फूर्त प्रतिसाद…

 

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे)- श्री. कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या वतीने आयोजित नव वर्ष स्वागत यात्रेत आज, रविवारी दि. 30 मार्च, 2025 रोजी पहिल्यांदा जिल्हा परिषद, ठाणे मार्फत चित्ररथ सादरीकरण करून सहभाग नोंदवला गेला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने या स्वागत यात्रेत ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहिती सादर करणारा चित्ररथ तयार करण्यात आला होता. नागरिकांनी या चित्ररथास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

  या यात्रेचे 25 वे वर्ष असल्यामुळे ‘संस्कृतीचा महाकुंभ’ यंदाच्या यात्रेत पाहण्यास मिळाले असून विविध संस्था, महाविद्यालये तसेच शाळांसह जिल्हा परिषदेचा सहभाग होता. 50% अनुदानावर संकरीत गायींचे / म्हशीचे वाटप, अनु.जाति/अनु.जमाती/दारिद्रय रेषेखालील बाळंत महिलेला बुडीत मजुरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना/बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना, गरोदर स्तनदा मातांना अतिरिक्त आहार अंतर्गत (बाळंतविडा), कुपोषित मुलांना / गरोदर स्तनदा मातांना विशेष आहार, उच्च व तांत्रिक शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती, प्रधानमंत्री आवाज योजना-ग्रामीण अशा विविध योजनाबद्दल सविस्तर माहिती चित्ररथातुन देण्यात आली.

 स्वागत यात्रा श्री. कौपिनेश्वर मंदिर – रंगो बापूजी गुप्ते चौक जांभळी नाका – दगडी शाळा – श्री गजानन महाराज चौक – तिन पेट्रोल पंप – हरिनिवास सर्कल – नौपाडा पोलिस स्टेशन – टेलिफोन एक्सचेंज चौक – गोखले रोड – स्वीट कॉर्नर – राम मारुती रोड – पू ना गाडगीळ ज्वेलर्स – तलावपाळी – उजवीकडे वळून पुन्हा कौपिनेश्वर मंदिर या मार्गे चित्ररथावरील योजनाचे सादरीकरण चलचित्रामार्फत (व्हिडीओ) करण्यात आले. नागरिकांना जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहिती व्हावी, या उद्देशाने चित्ररथ तयार करण्यात आले होते.

      कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या वतीने आयोजित नव वर्ष स्वागत यात्रेत जिल्हा परिषदेत नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा परिषदेचा सहभाग महत्त्वाचा होता. नागरिकांनी देखील उत्तम प्रतिसाद दिल्याने जिल्ह्यात चित्ररथाची चर्चा सर्वत्र सुरू आहे, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) अविनाश फडतरे यांनी दिली.

   यावेळी जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या चित्ररथास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

0000000

संबंधित पोस्ट

मंडळ, ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण-प्रशासकीय कामकाजात संवाद कौशल्य वापरा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

राज्यातील 4 लाख 92 हजार 532 असाक्षरांनी दिली**पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीची परीक्षा*

vishwatmaklokswamivarta

आगामी काळात ‘महाक्राईमओएस’ चा राज्यभर होणार वापर; २ कोटी रुपयांचा निधी मंजूर ‘एआय’ आधारित गुन्हे तपासाच्या प्रायोगिक प्रकल्पाला मिळाले आर्थिक बळ

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ…

दिव्यांग उमेदवारांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र अनिवार्य १ मे २०२५ पासून नव्या अटींची अंमलबजावणी..

बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी पंचसूत्री कार्यक्रमप्रभावीपणे राबवावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी