vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी पंचसूत्री कार्यक्रमप्रभावीपणे राबवावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी पंचसूत्री कार्यक्रमप्रभावीपणे राबवावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर , प्रतिनिधी- बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत असलेला बाल पंचसूत्री कार्यक्रम प्रभावीपणे राबवा. बालकामगार निर्मूलन ,बालभिक्षेकरी प्रतिबंध आणि शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण तसेच बालकांची आरोग्य तपासणी इ. मोहिमा राबवून हे अभियान पूर्णत्वास न्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

 जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चीमंद्रे. जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, कामगार विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकन्या मुळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश पुंगळे यांच्यासह बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

 शहरांमध्ये रस्त्यावर, सिग्नल आणि चौक महत्त्वाच्या ठिकाणी धाडसत्र राबवून बालभिक्षेकऱ्यांना बालगृहात प्रवेशित करून त्यांना आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून पुनर्वसन करावे. जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रत्येक शाळेमध्ये बालकांच्या आरोग्य तपासणी करून घ्यावी. त्यांच्या आजाराचे निदान,औषधोपचार व मोठ्या आजाराचे निदान करण्यासाठी संदर्भित करावे. जिल्ह्यातील डॉक्टर्स,सामाजिक संस्था आणि प्रशासकीय यंत्रणेतील सर्व अधिकारी यांनी समन्वयाने ही मोहीम पूर्ण करावी. बालकांच्या हक्काबाबत सर्व विभागांमधून जाणीव जागृती व समाज माध्यमाचा वापर करून प्रत्येक संबंधित शासकीय विभागाने बालभिक्षेकरी ,बालकामगार आणि शाळाबाह्य मुलांना शाळेमध्ये प्रवेशित करण्यासाठीचे विशेष प्रयत्न करावेत. प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये बालस्नेही पोलीस कक्ष आणि नागरी भागामध्ये वाढ संरक्षण समिती तसेच ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीत ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करून कारवानी करण्याबाबतही महापालिका आणि जिल्हा परिषद यांना सूचित करण्यात आले उभारण्याबाबत यावेळी निर्देशित करण्यात आले. चाईल्ड हेल्प लाईन १०९८ आणि पोलिस विभागाच्या ११२ या क्रमांक वर हेल्पलाइन मार्फत बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी माहिती आणि तक्रार दाखल करण्यात नागरिकांनीही पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.

०००००

संबंधित पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्यास सहकार् करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन सेवेतून निलंबित करणार- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे 10 मे रोजी आयोजन जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा लाभ

मराठवाड्यात शिवसेनेचा नवा चेहरा डॉ. संजय लाखे पाटील यांच्यावर दुहेरी जबाबदारी..शिवसेना पक्ष संघटनेतील महत्वाच्या पक्ष सचिव पदा सह सहमुख्य संपर्क प्रमुख मराठवाडा (नांदेड आणि हिंगोली जिल्हा शिवसेना पक्षसंघटना) नियुक्ती करून मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा पुन्हा विश्वास

सैनिकी मुलांच्या वसतीगृहात चौकिदार पदासाठी 20 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थ्यांशी संवाद-गावागावातील लाभार्थ्यांचा उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद.महिला लाभार्थ्यांचा थेट शिवारातून उपक्रमात सहभागविभागीय आयुक्तांकडून अडचणी सोडविण्याबाबत महिलांना आश्वासन500 वर बचत गटातील 6 हजार महिला सहभागी…

नियतकालीक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) व असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वर्षिक सर्वेक्षण (ASUSE) 2026 करीता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे प्रगणकांना अचूक माहिती देणेचे आवाहन