vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मंडळ, ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण-प्रशासकीय कामकाजात संवाद कौशल्य वापरा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मंडळ, ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण-प्रशासकीय कामकाजात संवाद कौशल्य वापरा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-ग्राम,तालुकास्तरावरील अधिकारी – कर्मचारी हेच प्रशासनाचा चेहरा असतात. आपल्या संभाषणानुसार आपली वैयक्तिक नव्हे तर प्रशासनाचीही प्रतिमा जनमानसात तयार होते. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात संवाद कौशल्य अवश्य वापरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.

 छत्रपती संभाजीनगर, पैठण व फुलंब्री येथील मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांची एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर हे उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, नीलम बाफना, तहसिलदार डॉ. शिवानंद बिडवे, श्रीमती योगिता खटावकर, उमेश पाटील, ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष अनिल सुर्यवंशी, सतिष भदाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, प्रशासकीय यंत्रणेला अद्यावत तंत्रज्ञान, कायद्यातील बदल, सामजिक बदल यानुसार करावयाचे प्रशासकीय कामकाज याबाबत प्रशिक्षणातून मार्गदर्शन केले जावे. दैनंदिन कामकाजात होणाऱ्या लहान लहान चुका यातून टाळता येतील. त्यासाठी नागरिकांशी साधावयाचे संवाद याबाबत कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे.

 प्रमुख मार्गदर्शक संजय कुंडेटकर यांनी उपस्थितांना महसूली कायदे, गाव पातळीवर द्यावयाच्या सेवा, विविध दाखले, परवानग्या याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

०००००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या17 जणांवर दंडात्मक कारवाई

विचारवेध’मध्ये 3 जुलै रोजी ऐरोलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात श्री.अविनाश धर्माधिकारी करणार राजर्षी शाहू महाराजांना वैचारिक अभिवादन

बस थांब्यावर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करून सीसीआयच्या जाचक अटी रद्द करा – जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

vishwatmaklokswamivarta

मुंबई पोलीस दलातील  ३ पोलीस शिपाई यांना पोलीस हवालदार व १ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती..

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यासाठी शासनाची जोरदार तयारी- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची घोषणा…