द्वारका, दिल्ली | मोहन गार्डन परिसरात मोठी दुर्घटना टळली
नवी दिल्ली प्रतिनिध-
सुमारे रात्री ९.३९ वाजता मोहन गार्डन परिसरातील चार मजली निवासी इमारतीत गॅस सिलिंडरला आग लागल्याची माहिती पीसीआरला मिळाली
मोहन गार्डनचे एसएचओ मुकेश अँटिल यांच्या तत्परतेमुळे आणि बीट कॉन्स्टेबल अनिल यांच्या धाडसामुळे अनेकांचे प्राण वाचले.
स्वतःचा जीव धोक्यात घालून कॉन्स्टेबल अनिल यांनी जळता गॅस सिलिंडर घराबाहेर ओढून काढला आणि आग आटोक्यात आणली. या इमारतीत १६ कुटुंबे राहतात. त्यांच्या वेळेवर केलेल्या कृतीमुळे मोठी दुर्घटना टळली.कॉन्स्टेबल अनिल यांच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 🙏