vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्रासह उत्तर भारतात कडाक्या थंडीची शक्यता -हिमाचल प्रदेश पश्चिमी विक्षोपमुळे थंडीची तीव्र लाट  अनेक ठिकाणी ताशी चाळीस ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहत असून बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लेह-लडाख, काश्मीर खोरे आणि हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी.

 महाराष्ट्रासह उत्तर भारतात कडाक्या थंडीची शक्यता -हिमाचल प्रदेश पश्चिमी विक्षोपमुळे थंडीची तीव्र लाट  अनेक ठिकाणी ताशी चाळीस ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहत असून बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लेह-लडाख, काश्मीर खोरे आणि हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी..

 राज्य प्रतिनिधी-उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र झाली असून, त्याचा परिणाम महाराष्ट्र, विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. भारतीय हवामान विभागाने या संदर्भात सतर्कतेचा इशारा दिला असून पुढील काही दिवसांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे.

दक्षिणेकडून आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे महाराष्ट्रातील काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस मेघगर्जनेससह हलका पाऊस पडू शकतो. केरळच्या किनारपट्टीवर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि तिथून येणारे बाष्पयुक्त वारे यामुळे हे हवामान बदल घडत आहेत. राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये सध्या पश्चिमी विक्षोपमुळे थंडीची तीव्र लाट पसरली आहे. अनेक ठिकाणी ताशी चाळीस ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहत असून बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लेह-लडाख, काश्मीर खोरे आणि हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. २७ जानेवारीच्या सुमारास ही बर्फवृष्टी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राजधानी दिल्लीत तापमानाचा पारा चार ते सहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. काश्मीरमधील सरोवरदेखील गोठले असून, पहाटेच्या वेळी रस्ते आणि बागांवर बर्फाचे जाड थर साचलेले दिसत आहेत. हिमालयातून येणाऱ्या या थंड वाऱ्यांमुळे केवळ उत्तरच नव्हे, तर मध्य भारतातही पुढील अठ्ठेचाळीस तासांत थंडीची तीव्रता अधिक वाढणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ३० जानेवारीच्या रात्रीपासून आणखी एक पश्चिमी विक्षोप सक्रिय होणार आहे. यामुळे संपूर्ण उत्तर भारतात पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. या थंडीचा प्रभाव मध्य प्रदेशपर्यंत आणि अंशतः महाराष्ट्रातील खान्देश व नाशिक पट्ट्यात जाणवेल. या काळात उत्तर भारतात दाट धुके पडण्याची शक्यता असल्याने वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो.

महाराष्ट्रात एकीकडे कडाक्याची थंडी आणि दुसरीकडे अवकाळी पावसाचे सावट यामुळे शेतीकामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

संबंधित पोस्ट

बारामतीत सुनेत्रा ताई अजित पवार यांचा ऐतिहासिक विजय; विक्रमी मताधिक्याने रचला नवा इतिहास…

महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळाचे राज्यातील जनतेकरिता मंत्रिमंडळ निर्णय…

vishwatmaklokswamivarta

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी-वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे कामगार व नोकरदार महिलांना मिळणार दिलासा

आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार नावाने दिला जाणार,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा..

vishwatmaklokswamivarta

देशातील युवा परदेशात जातोय… हे थांबलं पाहिजे – सपा राज्य उपाध्यक्ष जोशी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने समाजवादी पक्षाची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta