vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सोनाली वैद्य यांना ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी प्रदान; नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे विशेष सत्कार

सोनाली वैद्य यांना ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी प्रदान; नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे विशेष सत्कार

जालना, प्रतिनिधी: विद्याचल शिक्षण संस्था, जालना येथून सौ. सोनाली सुयोग वैद्य (कुलकर्णी) यांना ग्रंथालय व माहितीशास्त्रातील पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली. ही उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी केल्याबद्दल श्री नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी सुहास वैद्य, लता वैद्य, नारायण वैद्य, सुयोग वैद्य, अश्विनी वैद्य, अमोल टाकळकर, मुकुल देशपांडे तसेच दर्पण जैन उपस्थित होते.सोनाली वैद्य यांनी मिळविलेल्या या शैक्षणिक यशाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीयांसह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला

ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्रातील उच्च शिक्षण पूर्ण करून सोनाली वैद्य यांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. त्यांच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

संबंधित पोस्ट

पनवेल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

ग्रामीण भूमिहीन लाभार्थ्यांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ द्यावा-ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे,मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत 72 हजार घरकुल पूर्ण…

vishwatmaklokswamivarta

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून पद व गोपनीयतेची शपथ

vishwatmaklokswamivarta

प्रांतधिकारी, जात पडताळणी अधिकाऱ्यांसोबत अडीच तासांची सविस्तर बैठक**आजपासून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात शिबिर ; शून्य प्रलंबित्व करण्याचे आदेश**मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड यांचा आठही जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद*

vishwatmaklokswamivarta

उरण टपाल कार्यालयासाठी जागेची मागणी-इच्छुकांनी 28 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन…

फार्मर आयडी 20 मे 2026 पूर्वी काढण्याचे आवाहन