vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

पुणे, प्रतिनिधी : भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु झाले असून मंदिरात प्रतिदिन एक हजार भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. भाविकांनी दर्शनासाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या https://shreebhimashankar.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पास उपलब्ध होणार आहे. नोंदणीकृत भाविकांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असून दर्शनाकरिता पास अनिवार्य करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

भाविकांना ३० जून २०२६ पर्यंत दररोज सकाळी ७ ते ११ वा. दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनी दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य करण्यात आले आहे. भाविक तसेच स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे.

सन 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रयागराज महाकुंभ 2025 च्या अनुभवाच्या आधारे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांपैकी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता आहे. संभाव्य वाढत्या गर्दीच्या अनुषंगाने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारणीची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे नवीन सभामंडप व पायरी मार्गाचे काम सुरु असल्याने, देवस्थान ट्रस्टने ९ जानेवारी २०२६ पासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सदर बंद कालावधीस ३१ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मुख्य मंदिरासमोरील सभामंडपाचे काम पूर्ण करण्यासाठी सामान्य परिस्थितीत सुमारे एक वर्षाचा कालावधी अपेक्षित होता. तथापि, भीमाशंकर संस्थान, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविक यांच्या सहकार्यामुळे तसेच रात्रंदिवस अखंड काम सुरु ठेवण्यात आल्याने हे काम केवळ पाच महिन्यांत पूर्णत्वास आले आहे.

मुख्य सभामंडपाचे काम पूर्ण करण्यात आले असून दर्शनबारी उभारणी, परिसर स्वच्छता, भाविकांसाठी सुविधा व गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत कामे पूर्ण झाली आहे. सर्व कामे अंतिम टप्प्यात असून उर्वरित किरकोळ कामे जलदगतीने पूर्ण करुन बांधकाम साहित्य, दगड व यंत्रसामग्री हटवून परिसर भाविकांसाठी मोकळा करण्याच्यादृष्टीने श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट यांनी मंदीर दर्शनाकरिता खुले केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे

0000

संबंधित पोस्ट

बीडीडी चाळ ‘अत्यावश्यक प्रकल्प’ म्हणून घोषित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

आताची बातमी – बीड जिल्हा चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सहा आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधांच्या पूर्वतयारीबाबत महानगरपालिका आयुक्त  भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा…

vishwatmaklokswamivarta

वांद्रे पूर्व येथील उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंडाचे-सार्वजनिक बांधकाम विभागास नि:शुल्क हस्तांतरण..

परीक्षा केंद्राला जिल्हाधिकारी यांची अचानक भेट दहावी व बारावी परीक्षामधील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

vishwatmaklokswamivarta