vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सोमवारीअमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सोमवारीअमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली

             सांगली, प्रतिनिधी : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने येत्या 24 ऑगस्टला अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढण्यात येणार असून, अमली पदार्थविरोधी या रॅलीत सर्व विभागांनी सहभाग घेऊन रॅली यशस्वी करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या.

       जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस महापालिका अतिरीक्त आयुक्त राहुल रोकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, सहाय्यक आयुक्त (अन्न) रावसाहेब समुद्रे, जि्ल्हा एडस्‌ प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा व्यवस्थापक विवेक सावंत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, उच्च शिक्षण विभागाचे डॉ. प्रकाश बच्छाव, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे म्हणाले, जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम व शपथ घेण्यात आली. पुढील टप्पा म्हणून पालकमंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार 24 ऑगस्टला अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढण्यात येणार असून, नेमिनाथनगर ते पोलीस मुख्यालय अशी ही रॅली काढण्यात येणार आहे. सांगली पोलीस दलाकडून सांगली जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य, पोस्टर्स, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे बक्षीसवितरणही यावेळी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळा परिसरातील १०० मीटर अंतरावरील पान टपऱ्यांची तपासणी करावी. ज्या शाळांच्या परिसरात १०० मीटरच्या आत अशा पानटपऱ्या आढळून आल्यास त्याची माहिती संबंधित ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका यांना देण्यात यावी, अशा सूचना मागील बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिल्या होत्या.

त्यावर माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे म्हणाले, जिल्ह्यात महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत क्षेत्रात 12 ठिकाणी अशा पानटपऱ्या आढळल्या. त्यापैकी महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने 10 ठिकाणच्या पान टपऱ्या कारवाई करून हटवण्यात आल्या असून, 2 ठिकाणच्या पानटपऱ्या हटवण्याची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार दिनांक 14 ऑगस्ट रोजी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2003 चे कलम 4 व 6 अंतर्गत आरोग्य विभाग, पोलीस व अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयामार्फत संयुक्तरित्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण 38 व्यक्तिंवर कोटपाच्या कलम 4 व 6 अंतर्गत कारवाई करून एकूण रूपये 10400/-दहा हजार दंडशुल्क वसूल करण्यात आले. ही माहिती सहाय्यक आयुक्त रावसाहेब समुद्रे यांनी बैठकीत दिली.

संबंधित पोस्ट

२१ जुलै रोजी जालना येथे संविधानिक हक्कांसाठी मोर्चा; समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष गणेश चांदोडे यांचे आवाहन

सोलापूर जिल्ह्यातील शेलगाव येथेकेळी संशोधन केंद्र उभारण्याबाबत शासन सकारात्मक- कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाट

सोसायटी अचिव्हर्स’च्या कव्हर पेजवर मंत्री पंकजा मुंडे! ‘इथिकल लीडरशीप’च्या कार्याची दखल

आदिवासी आश्रम शाळांमध्ये 1 फेब्रुवारीपासून नवीन वेळापत्रक लागू होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके*आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सेवासुविधांकरिता भरघोस निधी उपलब्ध केला जाईल

vishwatmaklokswamivarta

अमडापूर येथे 8 मार्च रोजी विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा

भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल उभारणीला गती;रत्नागिरीच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला नवी दिशा– मंत्री नितेश राणे