vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापनेसाठी सविस्तर प्रस्ताव तयार करा- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश· कोकणातील उच्च कृषी शिक्षणाला मिळणार नवी दिशा

रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापनेसाठी सविस्तर प्रस्ताव तयार करा- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश· कोकणातील उच्च कृषी शिक्षणाला मिळणार नवी दिशा

मुंबई, : प्रतिनिधी कोकणातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर कृषी शिक्षण आणि अत्याधुनिक संशोधनाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठांतर्गत रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था उभारणे आवश्यक आहे. या संस्थेमुळे कृषी संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळेल. त्यामुळे याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करावा, असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापन करण्याबाबत कृषीमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. बैठकीला राज्यमंत्री योगेश कदम, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली चे कुलसचिव डॉ.संजय भावे, उपसिचव प्रतिभा पाटील यासह कृषी विभागाचे अधिकारी उप सचिव उपस्थित होते.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, वाकवली येथे मध्यवर्ती संशोधन केंद्रामध्ये पदव्युत्तर कृषी शिक्षण व संशोधनासाठी आवश्यक असलेले विस्तीर्ण क्षेत्र, संशोधनासाठी उपलब्ध प्रयोगशाळा, पायाभूत सुविधा आणि लागवडीयोग्य जमीन उपलब्ध असल्याने या ठिकाणी पदव्युत्तर संस्था स्थापन करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. या संस्थेमुळे कृषी संशोधनाला चालना मिळण्याबरोबरच कोकणातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध होणार असून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीलाही गती मिळणार आहे.

पदव्युत्तर कृषी विज्ञान संस्था हा ऐतिहासिक प्रकल्प ठरेल- राज्यमंत्री योगेश कदम

राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, रत्नागिरी आणि संपूर्ण कोकणासाठी वाकवली येथील पदव्युत्तर कृषी विज्ञान संस्था हा ऐतिहासिक प्रकल्प ठरेल. यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी इतर भागात जावे लागणार नाही. संशोधन, कौशल्य विकास आणि स्थानिक कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही संस्था अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

0000

संबंधित पोस्ट

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन;युवक-युवती व संस्थांकडून 8 एप्रिलपर्यंत अर्ज आमंत्रित

आफ्रिकेच्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावांच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय इबोला विषाणू रोगाच्या बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

vishwatmaklokswamivarta

गरीबशाह बाजार येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पाथरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे तातडीने सुरू करा – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta

बदलत्या काळाची गरज ओळखून डी. वाय. पाटील समूहाचे आरोग्य क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

vishwatmaklokswamivarta

हरियाना सरकारच्या धर्तीवर निवृत्ती वेतन मंजूर करा अन्यथा स्वातंत्र्य दिनापासून आंदोलन करणार – बाबासाहेब कोलते