vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन;युवक-युवती व संस्थांकडून 8 एप्रिलपर्यंत अर्ज आमंत्रित

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन;युवक-युवती व संस्थांकडून 8 एप्रिलपर्यंत अर्ज आमंत्रित

      अमरावती, प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य युवा धोरणानुसार सन 2025-26 या वर्षाकरिता जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी पात्र युवक-युवती व संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. समाजाच्या सर्वांगीण विकास प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार दिले जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी 8 एप्रिल 2026 पर्यंत आपले प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.  या पुरस्काराचे स्वरूप युवक व युवतींसाठी प्रत्येकी 10 हजार रुपये रोख, गौरव पत्र आणि सन्मानचिन्ह, तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एका नोंदणीकृत संस्थेसाठी 50 हजार रुपये रोख, गौरव पत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे.

   पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या युवक-युवतींचे वय 1 एप्रिल रोजी 15 वर्षे पूर्ण तसेच 31 मार्च रोजी 29 वर्ष पर्यंत असावे. जिल्ह्यात सलग पाच वर्षांचे वास्तव्य असणे अनिवार्य आहे. तसेच संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्टनुसार नोंदणीकृत असावी आणि ती किमान पाच वर्षे कार्यरत असावी. अर्जदारांनी आपल्या मागील तीन वर्षांतील कार्याचे पुरावे जसे की, वृत्तपत्रीय कात्रणे, प्रशस्तीपत्रे, फोटो व व्हिडिओ इत्यादी अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पुढील किमान दोन वर्षे सक्रिय राहण्याचे हमीपत्रही उमेदवारांना द्यावे लागणार आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचारी या पुरस्कारासाठी पात्र ठरणार नाहीत. अधिक माहिती व अर्जासाठी जिल्हा क्रीडा संकुल, मार्डी रोड, तपोवन गेटजवळ, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

000000000

संबंधित पोस्ट

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), येथेअभिरुप मुलाखत कार्यक्रम-2024

vishwatmaklokswamivarta

माजी केंद्रीय मंत्री, पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश कलमाडी यांचे निधन

…अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर संघर्ष अटळ-आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही-राज ठाकरे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना

धारणीतील महाविधी शिबिरात शेवटचा घटक आश्वस्त*विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम*36 स्टॉलवर शासकीय विभागांची माहिती….

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -4 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2025