vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यात मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यात मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा -१ अंतर्गत जिल्ह्यात ८४ मंडळस्तरावर दि.७ ते १४ मार्च व एप्रिल महिन्यात १० ते १७ एप्रिल या कालावधीत तर नगरपालिकास्तराव ८ ते १५ मे दरम्यान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे,असे निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी कळविले आहे

 महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी व ग्रामिण भागात नागरिक शेतकरी, विद्यार्थी , महिला यांच्या दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान टप्पा-१ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात हे अभियान राबविण्याची तयारी प्रशासनाने केली असून त्याचे नियोजन या प्रमाणे- मंडळस्तरावर पूर्वतयारी दि.५ मार्च पर्यंत, दि.७ ते १४ मार्च मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन, दि.१० ते १७ एप्रिल मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन, दि.८ ते १५ मे नगरपरिषद, नगरपंचायत स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ९ तालुके, ८४ मंडळ. ५०० सजा व १३६९ गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून सर्व मिळून ८४ शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 या शिबिरात प्रलंबित फेरफार, अभिलेख दुरुस्ती, ७/१२ नोंदी दुरुस्ती, महसूली कायद्यांची जनजागृत व अंमलबजावणी, पाणंद रस्ते, दाखले वाटप, तुकडे बंदी, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूरी अशा अनेक सेवा दिल्या जाणार आहेत.

०००००

संबंधित पोस्ट

बकरी ईदच्या अगोदर गोवंशाचे टॅगींग करावे*जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जालना येथे फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण, समाज कल्याण व विषय समित्यांच्या* *सभापदी पदांची निवड संपन्न*

मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचा सन्मान करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन’ केंद्राचे उद्घाटन

जिल्ह्यातील होमस्टे, लॉजेस, स्टे रूम, बंगले व बेड अँड ब्रेकफास्ट सुविधांसाठी नियमावली लागू; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

महिला दिनी ‘अस्मिता लीग’चे उद्घाटन; महिलांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे -केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे