vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व वित्तमंत्री कनूभाई देसाई यांच्या उपस्थितीत डाईंग अँड पेगमेंट्स असोशिएशन अमृत महोत्सव साजरा करणार..

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व वित्तमंत्री कनूभाई देसाई यांच्या उपस्थितीत डाईंग अँड पेगमेंट्स असोशिएशन अमृत महोत्सव साजरा करणार..

 मुंबई प्रतिनिधी

      मुंबई – रंगाशिवाय जीवन नाही. हे रंग जीवनाला जगण्याची प्रेरणा देतात. रंगाने रंगून जाते ही दुनिया… अशी ही रंगाची दुनिया. जे रंग आशा ,निराशा ,उत्साह, आनंद ,सौंदर्य याची महती सांगतात, अशा या रंगाच्या दुनियेतील रंगाचे उद्योग जगतात आपल्या नावाचा अजूनही दबदबा आहे. अशा रंगाने स्वातंत्र्य पूर्व काळात कापड गिरण्या आणि औद्योगिक क्षेत्रातील अन्य नवउद्योगांना लागणारे रंग आणि रंग मिश्रित रसायन तंत्रज्ञान यांचा पुरवठा केला आहे. असा पुरवठा करणाऱ्या डायिंग आणि पिग्मेंटेस असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे

    या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असून गुजरातचे वित्तंमंत्री कनुभाई देसाई हे विशेष अथिती म्हणून उपस्थितीत राहणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जनक मेहता यांनी दिली.

जागतिक औद्योगिक क्रांतीच्या लाटे नंतर स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात ही या औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या त्यात कापड गिरण्या यांची संख्या अधिक होती .मुंबई आणि सुरत सह भागात ही त्यांची संख्या कमी अधिक प्रमाणात होती. कापड उद्योगात रंग आणि रंग मिश्रित रसायन यांची मागणी लक्षात घेऊन ती पुरवण्याचे काम छोटे छोटे कारखानदार करीत असत . या व्यवसायावर पहिल्या जागतिक महायुद्धाचा परिणाम झाला.1940 _ 42 नंतर या उद्योग धंद्यास चांगले दिवस आले. स्वातंत्र्य पूर्व काळात काळात मुंबई आणि सुरत आणि इतर भागात कापड गिरण्या आणि इतर तत्सम उद्योगधंद्याना रंग आणि रंग मिश्रित रसायन तंत्रज्ञान कारखानदार लोकांची संघटना जन्मास आली . यंदाचे वर्ष हे अमृत महोत्सवी वर्ष म्हणुन साजरे होत आहे . त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मान्यवर आणि यशस्वी उद्योजकांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष जनक मेहता यांनी दिली.यावेळी संघटनेचे पदाधिकारी कमल कपूर, जितेंद्र पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

  विशेषतः या उदयोगाने कोरोनाच्या काळात आपल्या कुणाही कर्मचाऱ्याला कामावरून कमी केले नाही. याउलट जेवढी मदत करता येईल तेवढी मदत, सहकार्य केले. अशा उद्योगाचा जागतिक स्तरावर रंग आणि रंग मिश्रित रसायन यांचा पुरवठा करण्यात चीनच्या पाठोपाठ भारताचा क्रमांक आहे.

 या विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम अधिक सुलभ व्हावा यासाठी माटुंगा येथील विद्यापीठाशी आम्ही संलग्नित असल्याचे मेहता यांनी सांगितले. तसेच हा उपक्रम २००५ पासून संघटना राबवत असून यासंदर्भात शास्त्रज्ञ आणि तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घेण्यात येते. या उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी भारत सरकारचे पाठबळ मिळत असून खत निर्मिती प्रकल्पाशी आम्ही निगडित आहोत .आम्ही आमच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत असून २०४७ पर्यंत आमचं स्वप्न पूर्ण करायचे आमचा मानस असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले.

हा अमृत महोत्सव येत्या ११ एप्रिल रोजी शुक्रवारी वांद्रे येथील हॉटेल ताज लेंड्स मध्ये सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

पैठण रस्त्यावरील रहदारीसाठी पर्यायी वाहतुक मार्ग

मुंबईत ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर‘क्लस्टर रिडेव्हलपमेंट’ राबवणार; पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड मुंबई झोपडपट्टीमुक्तीसाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणाच्या हितासाठी पीएनजी जोडणीस प्राधान्य द्यावे**जिल्हाधिकारी संतोष पाटील*

सैन्याधिका-यांच्या पूर्वप्रशिक्षणासाठी अकोल्यात 13 जानेवारीला मुलाखती…

त्रिभाषा धोरण निश्चिती समिती बुधवारी (दि.२६) विभागात…

vishwatmaklokswamivarta

जनगणना २०२७ साठी आज १ मे पासून होणार स्वयं-नोंदणी सुरू-नागरिकांनी सहभागी होण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन