vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

जिल्ह्यात एल.पी.जी. गॅसचा मुबलक साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन तक्रारीसाठी तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर

जिल्ह्यात एल.पी.जी. गॅसचा मुबलक साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन तक्रारीसाठी तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर

      अमरावती, प्रतिनिधी मध्यपूर्व आशिया, अमेरिका व युरोपियन खंडात सध्या सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या बीपीसीएल (BPCL), एचपीसीएल (HPCL), व आयओसीएल (IOCL) या तिन्ही कंपन्यांच्या एल.पी.जी. गॅस सिलेंडर वितरकांची बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्ह्यामध्ये एल.पी.जी. गॅस सिलेंडर साठा पुरेसा उपलब्ध असून नागरिकांना बुकिंगनंतर लवकरात लवकर ‘फर्स्ट इन फस्ट आउट’ (FIFO) ऑर्डरनुसार सिलेंडर उपलब्ध होईल. तसेच गॅस एजन्सीवर गर्दी होऊ नये, यासाठी टोकन सिस्टीम लागू करावी. तसेच बुकिंगनंतर ८ दिवसांचे आत ग्राहकाला सिलेंडर उपलब्ध होईल, असे नियोजन करण्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच ऑईल कंपन्या मिळून जिल्ह्यातील एल.पी.जी. गॅस सिलेंडर साठा पुरेसा उपलब्ध राहील याबाबत कटीबद्ध आहेत. त्यामुळे गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी टाळावी तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा करण्यात येईल.

     सिलेंडरच्या वितरणात काही अडचणी उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ संबंधित तालुकानिहाय नियुक्त केलेल्या खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. यामध्ये जिल्हा हेल्पलाईन क्रमांक ७२१९१११४२४ असून, अमरावती शहरासाठी प्रविण राऊत (९६७३१६१९७५), मोर्शी तालुक्यासाठी सागर बगाडे (८६००८५६४३१), नांदगाव खंडेश्वर तालुक्यासाठी शीतल राठोड (९४२१८६९९९५), वरुड तालुक्यासाठी निखील नलावडे (९८२२५०८४०३), अंजनगाव सुर्जी तालुक्यासाठी रणजीत रामाघरे (९५११७१५१९२), तिवसा व अमरावती ग्रामीण तालुक्यासाठी शीतल आंबटकर (९०११३४१२८७), भातकुली तालुक्यासाठी मोनाली भोवरे (९५५२८७१५७२), धामणगाव रेल्वे तालुक्यासाठी प्रवीण भागवत (७०३८६०६३८५), अचलपूर तालुक्यासाठी राहुल केदारे (९६६५७४४८४९), चांदुर रेल्वे तालुक्यासाठी विश्वनाथ पखाले (९६७३५६१९६४), धारणी तालुक्यासाठी रमेश वाढवे (९४०३५३२१९०), चिखलदरा तालुक्यासाठी गणेश इंगळे (७५०७९५३५५५), दर्यापूर तालुक्यासाठी वैभव महाजन (९४०४२०७६०२) आणि चांदूर बाजार तालुक्यासाठी जितेंद्र पाटील (९३५६७४२५२८) यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी केले आहे

00000000

संबंधित पोस्ट

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंच उद्‌घाटन सोहळ्याच्या अनुषंगाने कोल्हापूरात वाहतुकीचे नियोजन*

गडचिरोलीतील नागरिकांना आता ‘स्पेक्स २०३०’ उपक्रमाद्वारे नेत्रसेवा मिळणार  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेचा उपक्रम

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकर सुरू करा- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर शिवसेना शिष्टमंडळाने घेतली जि.प.सिईओची भेट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण..

फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांना महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन

खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंदणी-भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक ‘गोजातीय प्रजनन व नियमन’ विषयावर कार्यशाळा संपन्न