vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरप्रदेशस्थानिक बातम्या

खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंदणी-भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक ‘गोजातीय प्रजनन व नियमन’ विषयावर कार्यशाळा संपन्न                                          

खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंदणी-भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक ‘गोजातीय प्रजनन व नियमन’ विषयावर कार्यशाळा संपन्न

                                                                                                                                                                                                                                                                                 नांदेड प्रतिनिधी:- राज्यातील खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून राज्यातील पशुवैद्यकीय सेवेची संख्यात्मक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार असून, त्यामुळे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचा दर्जा व गुणवत्ता आणखी वृद्धींगत होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन आयुक्त पशुसंवर्धन यांनी केले.

                                                             औंध येथील पशुसंवर्धन आयुक्तालयातील कामधेनू हॉल येथे ‘गोजातीय प्रजनन व नियमन’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त पशुसंवर्धन तथा अध्यक्ष, महाराष्ट्र गोजातीय प्रजनन व नियमन प्राधिकरण डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत विविध तज्ज्ञ अधिकारी, सेवा पुरवठादार आणि संस्थात्मक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन कायदा व नियमांची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. यासोबतच कृत्रिम रेतन (AI) सेवा आणि नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन (NDLM) अंतर्गत डिजिटल ट्रॅकिंगच्या तांत्रिक एकत्रीकरणावर तसेच राज्य व केंद्र सरकारच्या भविष्यकालीन धोरणांवर कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त व प्राधिकरणाचे सदस्य डॉ.                                                                                   डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी ‘महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन कायदा व नियमांची प्रभावी अंमलबजावणी’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कृत्रिम रेतन सेवा आणि NDLM डिजिटल ट्रॅकिंग आवश्यक असल्याने या तांत्रिक बाबींवर त्यांनी विशेष भर दिला. राज्यामध्ये उच्च उत्पादनक्षम पशुधनाच्या संख्यात्मक वाढीसाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी कृत्रिम रेतनाच्या कार्यात अधिकधीक पारदर्शकता निर्माण करणे आवश्यक आहे. खाजगी कृत्रिम सेवादातांनी याकरिता पशुसंवर्धन विभागाच्या सोबतीने काम केले पाहिजे. या कामात खाजगी कृत्रिम सेवादातांना पशुसंवर्धन विभाग सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही उपस्थितांना डॉ. किरण पाटील यांनी दिले.

तज्ज्ञांचे सादरीकरण आणि तांत्रिक सत्र

कार्यशाळेच्या उत्तरार्धात विविध संस्थांच्या तज्ज्ञांनी आपले अनुभव आणि तंत्रज्ञान याविषयी सादरीकरण केले. बायफ, पुणे येथील डॉ. जयंत खडसे यांनी गोजातीय पैदाशीतील बायफच्या अनुभवांवर प्रकाश टाकला. चितळे-ABS जेनस प्रा. लि. चे डॉ. परिक्षित देशमुख यांनी ‘जेनोमिक्स आणि सेक्स्ड सीमेन’ या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गोवंश उत्पादकता व पैदास कशी सुधारावी, याबद्दल तांत्रिक माहिती दिली.

                                                                                                                                                                                                                      प्रणालीची उपयोगिता व वापर याबाबत सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. राजू कोलते यांनी उपस्थित खाजगी कृत्रिम सेवादात्यांना मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रानंतर उपस्थित सर्व प्रतिनिधी व अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊन विविध मुद्द्यांवर अभिप्राय घेण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय तथा, महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. प्रशांत भड यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला.

0000

संबंधित पोस्ट

कायदेशीर जनजागृतीबाबत सातारा शहरात शालेय मुलांची रॅली

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मास्टर प्लॅन राबविण्यावर भर – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

कान्होजी आंग्रे वनउद्यान अलिबाग येथे वन कट्टाचे उद्घाटन संपन्न..

जिल्हा विकास आराखड्यांतर्गत धोरणात्मक कामांसाठीजिल्हा वार्षिक योजनेतील 25 टक्के निधी राखीव ठेवावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न- सन 2026-27 साठी 676 कोटी 29 लाख रूपये नियतव्यय मंजूर – गत आर्थिक वर्षातील निधी जवळपास 100 टक्के खर्च

लातूर जिल्ह्यातील एस.टी. आगारांमध्ये-प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिनाचे आयोजन