vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

2 व 4 जून रोजी यलो अलर्ट जारी हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना 

2 व 4 जून रोजी यलो अलर्ट जारी हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

                                                                                                                                                        राज्य प्रतिनिधी    –                                                                                                 नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 2 व 4 जून 2026 हे दोन दिवस येलो अलर्ट जारी केलेला आहे. 2 जून रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरुपाचा व दि. 4 जून 2026 यादिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर     या गोष्टी कर

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

आधुनिक तंत्रज्ञानामुळे भात शेती अधिक किफायतशीर व उत्पादनक्षम होणारतुळशी येथे खरीपपूर्व भात लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

नव्या मुंबईत 1 जुलै रोजी घडलेल्या 2 दुर्दैवी घटनांच्या अनुषंगाने आरोग्य व विद्युत विभागाच्या अधिका-यांवर निलंबनाची कारवाई

आत्ताची मोठी बातमी 🚍 राज्य परिवहन महामंडळाची शिवनेरी बससेवा आता फक्त मुंबई–पुणे नव्हे, तर नाशिक–पुणे, पुणे–कोल्हापूर, नागपूर–अमरावती, पुणे–सोलापूरसारख्या मार्गांवरही लवकर सुरू होणार!

vishwatmaklokswamivarta

पोलीस दलाची कार्यक्षमता व बौद्धिक वाढीसाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार – केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय स्पर्धेत सर्वोच्च विजेता ठरला तेलंगणा संघ; अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यातील स्पर्धांची सांगता

वंदे मातरम्’मधून स्वातंत्र्याचा गौरव आणि देशभक्तीचा जागर,सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १५ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे देशभक्तीपर गीत व नृत्यावर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

काढणीपश्चात पायाभूत सुविधा प्रक्रिया, पॅकेंजिंग युनिट्स घटकासाठी 6 जुलैपर्यंत अर्जाचे आवाहन