vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

छत्रपती संभाजीनगर विभागात’ दर्जेदार कृषि निविष्ठा वेळेत मिळण्यासाठी भरारी पथके’ सज्ज

छत्रपती संभाजीनगर विभागात’ दर्जेदार कृषि निविष्ठा वेळेत मिळण्यासाठी भरारी पथके’ सज्ज

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि औषधे योग्य दरात व वेळेत मिळण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांसाठी ‘विभागीय भरारी पथके’ स्थापन करण्यात आली असून, तंत्र अधिकारी श्री. ए. एल. काळुशे यांच्याकडे ‘पथक प्रमुख’ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.पी. ए ताजने हे मोहीम अधिकारी, आणि एच. एस कातोरे. जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय हे पथकातील सदस्य असून एस. जी. बंडगर विभागीय गुणनियंत्रण य निरीक्षक हे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कृषी निविष्ठांची साठेबाजी, जादा दराने विक्री किंवा कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधित विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द केले जातील. तसेच गंभीर स्वरूपाच्या गैरव्यवहारांसाठी दोषींवर थेट फौजदारी (क्रिमिनल) गुन्हे दाखल करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.

 तक्रार निवारण कक्ष स्थापन

कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने खरीप हंगामात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी विभाग स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे . ९४२१२३३२७० या मोबाइल क्रमांक तसेच १८००२३३४००० टोल फ्री संपर्क क्रमांकावर शेतकऱ्यांनी निविष्ठा उपलब्धता, अडचणी, तक्रारीबाबत संपर्क करावा . असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक श्री सुनील वानखेडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचे  भूमिपूजन

१०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयातून चांगली आरोग्य सेवा मिळणार : रोहयो मंत्री भरत गोगावलेमहाड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भुमीपुजन…

राष्ट्रीय लोकअदालतीत ३५ हजार ९३२ प्रकरणे निकाली; सुमारे ५० कोटी रुपयांची तडजोड-जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत उत्साहात संपन्न

महसूल सुनावण्या डिजिटल होणार! महसूल विभागाचे महत्वाकांक्षी पाऊल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात’प्रत्यय’ ऑनलाइन प्रणालीची अंमलबजावणी श्रम आणि पैशांची होणार मोठी बचत…

काँग्रेस नेते राहुलगांधी यांच्या दिल्ली तीन निवासस्थानी- इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिवसेना-भाजपची टीका

पेण भूगर्भातून आवाज येवून जमिन हादरल्याच्या घटनेचेभूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांच्या मार्फत सर्वेक्षण..

vishwatmaklokswamivarta