vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नव्या मुंबईत 1 जुलै रोजी घडलेल्या 2 दुर्दैवी घटनांच्या अनुषंगाने आरोग्य व विद्युत विभागाच्या अधिका-यांवर निलंबनाची कारवाई

नव्या मुंबईत 1 जुलै रोजी घडलेल्या 2 दुर्दैवी घटनांच्या अनुषंगाने आरोग्य व विद्युत विभागाच्या अधिका-यांवर निलंबनाची कारवाई

 

नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ सार्वजनिक रुग्णालय, ऐरोली, येथे दि. 30 जून 2026 रोजी श्रीम.सोनम डोंगरे व श्रीम. रिचा मिश्रा या 08 महिन्यांच्या 02 गर्भवती महिला दाखल झाल्या होत्या. दिनांक 30 जून 2026 रोजी दोन्ही रूग्णांना Inj. Duvadilan व Inj. Dexa Methasone दिले होते. दि. 01 जुलै 2026 रोजी श्रीम. सोनम डोंगरे यांना Inj. Dexa Methasone देण्यात आले व श्रीम. रिचा मिश्रा यांना Inj. Duvadilan व Inj. Dexa Methasone देण्यात आले होते. श्रीम. सोनम डोंगरे व श्रीम. रिचा मिश्रा यांची प्रकृती गंभीर झाली. तद्नंतर महानगरपालिका रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना व्हेटीलेटरवर ठेवून स्थिर करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारादरम्यान श्रीम. सोनम डोंगरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    सदरचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे असल्याने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरीता दि.01 जुलै 2026 रोजीच्या आदेशान्वये जिल्हा शल्यचिकित्सक ठाणे, सर ज.जी.समूह रूग्णालये व ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथील स्त्रीरोग व प्रसूती विभाग प्रमुख आणि नवी मुंबई स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेचे प्रतिनिधी तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नमुंमपा यांची चौकशी समिती नेमून 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.    तसेच सदर दोन्ही इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबविण्यात आला असून सदर सर्व इंजेक्शन्स सिलबंद केले असून त्याचे नमुने अन्न व औषध प्रशासन, ठाणे यांचेकडे पुढील तपासणीसाठी पाठविले आहेत. उपरोक्त चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत राजमाता जिजाऊ रुग्णालय, ऐरोली येथील सदर रुग्णांवर उपचार करणा-या डॉ. भावना पगारे, स्त्रीरोग तज्ञ यांना दि.02 जुलै 2026 रोजीच्या आदेशान्वये सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. श्रीम.सोनम डोंगरे यांचे शवविच्छेदन कुटुंबाच्या विनंतीनुसार सर ज.जी.समूह रूग्णालये व ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे करण्यात येत आहे. तर श्रीम. रिचा मिश्रा यांच्यावर फोर्टीस रूग्णालय, वाशी येथे उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय अधीक्षक, सा.रू.वाशी नमुंमपा यांनी कळविले आहे.

 

घटना 2-अशाचप्रकारे दि.01 जुलै 2026 रोजी नेरुळ एल.पी. नाका पुलाखालील रस्त्यावर विद्युत पुरवठा करणा-या केबलचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आल्यामुळे तेथून पायी जात असलेल्या दोन विद्यार्थींनींना विद्युत धक्का बसून अपघात घडला असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास मिळाली. दरम्यान दोन्ही विद्यार्थींनींना नागरिकांनी जवळच्या डी.वाय.पाटील रूग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात निगराणीसाठी फोर्टीस रूग्णालय, वाशी येथे दाखल केले आहे. वैद्यकीय अधीक्षक, सा.रू.वाशी यांच्या अहवालानूसार दोन्ही विद्यार्थींनींची प्रकृती स्थिर आहे.

 या प्रकरणी प्रथमदर्शनी विदयुत विभागाचा हलगर्जीपणा असल्याचे आढळून आल्यामुळे दि.02 जुलै 2026 रोजीच्या आदेशान्वये श्री. प्रविण हिंदूराव गाडे, कार्यकारी अभियंता (विद्युत) यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विदयुत निरीक्षक, उदयोग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग ठाणे-1 यांची नियुक्ती केली आहे.

 सदयस्थितीत पहिल्या घटनेतील श्रीम. रिचा मिश्रा व दुसऱ्या घटनेतील दोन विद्यार्थिनी या फोर्टीज हॉस्पीटल, वाशी येथे दाखल असून त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होत आहे. तसेच त्यांच्यावरील उपचाराचा खर्च नवी मुंबई महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

 सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार आरोग्य व विद्युत विभागातील संबंधित अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे.

00000

संबंधित पोस्ट

पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे उप वनसंरक्षक राहुल पाटील यांचे आवाहन

बॉलिवूड अभिनेता भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगालमधील राजकीय पक्षांमध्ये असलेल्या सर्व हिंदू समर्थकांना ममता बॅनर्जी यांच्या विरोधात येण्याचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

ऑनलाइन लर्निंग लायसन्स चाचणी बंद

vishwatmaklokswamivarta

विज्ञान व नवोन्मेषातून मानवकल्याणाचा संदेश देणारे डॉ. माशेलकर यांचे कार्य प्रेरणादायी – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या ‘More from Less for More’ पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

राज्यात कुठल्याही आस्थापनेत #माथाडीकामगार ची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात प्राधान्य द्यावे,-कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा