vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघनःशहरात दोन रेस्टॉरन्ट्सवर कारवाई;परवाने निलंबित

अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघनःशहरात दोन रेस्टॉरन्ट्सवर कारवाई;परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी (जिमाअन्न सुरक्षा व मानकांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्सवर अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. अखाद्य रंगांचा वापर, बुरशी लागलेला भाजीपाला, पिण्याचे पाणी विनामुल्य उपलब्ध असल्याबाबतचा फलक नसणे इ. कारणांमुळे या रेस्टॉरन्ट्सचा परवाना निलंबित करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली,अशी माहिती सह आयुक्त (अन्न) श्रीऱा. करकळे यांनी दिली आहे.

यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दि.२३ जून रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्स मध्ये तपासणी करण्यात आली. गेल्या दोन दिवस (दि.३० जूनपासून) कारवाई सुरु आहे. याल्ला-याल्ला रेस्टॉरन्ट गजानन महाराज मंदीर रोड व आईच्या गावात इतखेडा या रेस्टॉरन्ट्सची तपासणी करण्यात आली.

याल्ला याल्ला रेस्टॉरन्ट मध्ये कृत्रिम अन्न रंगाचा वापर बटर चिकन, पनीर ग्रीन, हरियाली कबाब, चिकन लॉलीपॉप अशा डिशेस मध्ये वापर होत असल्याचे दिसून आले. सर्व प्रकारच्या तयार रस्सा (ग्रेव्ही) मध्येही रंगाचा वापर होत होता. असे रंगाचे डबे जप्त करुन नष्ट करण्यात आले. स्वयंपाक घरात अन्न पदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी अस्वच्छता, बुरशी, काळे डाग असलेल्या भाज्या, उघड्यावर ठेवलेली ग्रेव्ही, कच्चे अन्नपदार्थ उघड्यावर व चांगल्या स्थितीत दिसून आले नाही. शिवाय पिण्याचे पाणी विनामुल्य उपलब्ध आहे,असा फलकही दिसून आला नाही

आईच्या गावात या रेस्टॉरन्ट मध्ये स्वयंपाक घरात बुरशी लागलेले अन्न पदार्थ, बटरच्या जागी प्रोफेशनल फॅट स्प्रेडचा वापर होत असल्याचे दिसून आले. ह्याचा वापर करुन लोकांना बटर तंदूर, बटर रोटी, बटर नान असे [अदार्थ दिले जात होते. पालेभाज्या शिळ्या व बुरशी असल्याचे दिसून आले. पदार्थ साठवण्यासाठी प्लास्टीक ड्रम वापरत असल्याचे दिसून आले.कच्चा माल असलेले अन्न पदार्थ व कचरा पेटी एकाच ठिकाणी होते. येथेही रंगाचा वापर दिसून आला. पिण्याचे पाणी विनामुल्य उपलब्ध आहे,असा फलकही दिसून आला नाही.

 या दोन्ही रेस्टॉरन्टचा परवाना पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे,असे सह आयुक्त श्रीऱा. करकळे यांनी कळविले आहे. या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती व.ता. रोडे, श्रीमती कि.ल. झाडे, सहायक आयुक्त द.वि. पाटील यांनी सहभाग घेतला.

०००००

संबंधित पोस्ट

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रंगीत तालीम

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची मुदत १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपणार असल्याने त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांसह अन्य कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत – राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे.

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा नियोजन विभागाची राज्यस्तरीय बैठक दूरदृष्यप्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न जिल्ह्यात जास्तीत जास्त लोकाभिमुख, लोकोपयोगी अन्,नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नायक’ आणि ‘अर्जुन’ टीबीएमचा शुभारंभ- ठाणे-बोरिवली प्रवासाचे अंतर आता फक्त १५ मिनिटांवर

vishwatmaklokswamivarta

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान : लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ

vishwatmaklokswamivarta

कृत्रिम बुद्धिमत्ता, बायोटेक, क्रिप्टो, ड्रोन आणि अँटी ड्रोन, इलेक्ट्रिक एनर्जी गुंतवणुकीसाठी आघाडीची क्षेत्रे

vishwatmaklokswamivarta