vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्य अभियंता मृद व जलसंधारण यांचे कार्यालय कार्यान्वित

मुख्य अभियंता मृद व जलसंधारण यांचे कार्यालय कार्यान्वित

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)-जिल्ह्यातील मुख्य अभियंता मृद व जलसंधारण हे कार्यालय आजपासून कार्यान्वित झाले. मुख्य अभियंता म्हणून हरिभाऊ गिते यांनी कार्यालयाच्या कामकाजास सुरुवात केली. मृद व जलसंधारण आयुक्त प्रतिभा इंगळे, ‘वाल्मी’चे महासंचालक सुनिल कुशिरे, जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय देवराज, वाल्मी सहसंचालक सुभाष कापगाते, जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेद्र कटके, जलसंधारण महामंडळाचे मुख्य लेखा परीक्षक गणेश पाटील, उपअभियंता किरण चाबुस्कवार, धोडाराम कासले, गणेश मुळे, महेश निनाळे, पवन ठरले, सह प्रादेशिक दक्षता गुण नियंत्रक कार्यलय, वाल्मी व आयुक्त कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
मृद व जलसंधारण विभागाच्या दि.२७ मे च्या शासन निर्णयानुसार मुख्य अभियंता मृद व जलसंधारण छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यालयाचे कार्यक्षेत्र छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातील ८ तसेच नाशिक प्रादेशिक विभागातील ५ असे एकूण १३ जिल्ह्यांचे असणार आहे. या कार्यालयाचे पहिले मुख्य अभियंता म्हणून हरिभाऊ गिते यांची करण्यात आली आहे.आयुक्त मृद व जलसंधारण यांनी त्यांचेकडे हा पदभार देण्यात आला आहे. वाल्मी परिसर, कांचन वाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे हे कार्यालय कार्यान्वित झाले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय समाज पक्षाने किसान सेल रासपा तालुका अध्यक्ष घनसांगी वैजनाथ केशवराव वायसे यांची नियुक्ती

जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाचे उद्घाटन व हिरवी झेंडी दाखवून रवाना

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत वीज देयक शून्य;जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत-225 लाभार्थ्यांची मोफत 2 डी इको तपासणी…

vishwatmaklokswamivarta

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक !

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने शासनास सादर करा – मंत्री छगन भुजबळ बियाणे, खते शेतकऱ्यांना मुबलक उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करा

vishwatmaklokswamivarta