vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सेवा संकल्प अभियानातून विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमांना गती जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम

सेवा संकल्प अभियानातून विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमांना गती

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम..

मुंबई, प्रतिनिधी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले जात वैधता प्रमाणपत्र विहित वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थी तसेच इयत्ता १२ वीमध्ये शिक्षण घेत असलेले आणि व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणारे २०२६-२७ मधील मागासवर्गीय विद्यार्थी यांना या मोहिमेचा लाभ मिळणार आहे.

अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग, एसईबीसी आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र पडताळणी समितीस्तरावर प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी त्रुटीपूर्तता कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे. प्रकरणांमधील त्रुटींची पूर्तता तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

त्रुटीपूर्ततेबाबत संबंधित समित्यांकडून एसएमएस, ई-मेल तसेच पत्राद्वारे अर्जदारांना कळविण्यात आले आहे. मात्र, अनेक अर्जदारांनी अद्याप संबंधित समित्यांशी संपर्क साधलेला नाही. जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्जातील त्रुटींची पूर्तता करून आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची जबाबदारी संबंधित अर्जदाराची आहे. त्यामुळे ज्या अर्जदारांनी किंवा विद्यार्थ्यांनी अद्याप त्रुटींची पूर्तता केलेली नाही, त्यांनी आपल्या संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी तातडीने संपर्क साधून आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जात वैधता प्रमाणपत्राअभावी पात्र मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहू नयेत, हा या विशेष मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. या मोहिमेमुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे कामकाज अधिक गतिमान व लोकाभिमुख होऊन विद्यार्थ्यांना विहित वेळेत जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. मोहिमेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक माध्यमे तसेच अन्य माध्यमांतून व्यापक प्रचार-प्रसिद्धी करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

दुष्काळग्रस्त भागात पोषण व आरोग्याच्या काळजीसाठी महिला व बालविकास विभाग सक्रिय – मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर वार्षिक१२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार…

महाराष्ट्र केसरी विजेत्या हर्षवर्धन सदगीरचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून अभिनंदन पै. हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरी किताबासह कुस्तीप्रेमींची मने जिंकली – उपमुख्यमंत्री

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा’चा उत्साहात शुभारंभ;शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली – आमदार संजय गायकवाड

जवाहर नवोदय विद्यालयात लॅटरल एन्ट्रीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta