vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्य शासनाचे विविध कृषी पुरस्कार जाहीर जिल्ह्यातील 6 शेतकरी व 1 अधिकारी यांची निवड

राज्य शासनाचे विविध कृषी पुरस्कार जाहीर जिल्ह्यातील 6 शेतकरी व 1 अधिकारी यांची निवड

सातारा, प्रतिनिधी: राज्यातील शेती, फालोत्पादन व कृषी संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या शेतकरी, संस्था व व्यक्तीना दिल्या जाणाऱ्या राज्य सरकारच्या प्रतिष्ठेच्या विभाग निहाय कृषी पुरास्कारांची सन २०२३ व २०२४ साठी घोषणा करण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण 6 शेतकरी व 1 अधिकारी यांची निवड झाली आहे.

वसंतराव नाईक कृषीभूषण श्री गणपत रामचंद्र पारटे रा. भिलार ता. महाबळेश्वर, युवा शेतकरी श्रीकांत महादेव घोरपडे रा. निसराले ता.सातारा, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार ऋषिकेश जयसिंग ढाणे रा. पाडळी ता सातारा, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न अंकुश रामचंद्र सोनावले सहाय्यक कृषी अधिकारी खोजेवाडी ता. सातारा, उद्यान पंडित श्री बबन रामचंद्र मुळीक रा. सासकल ता. फलटण, कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार अनंत हनमंतराव माने रा. रहिमतपूर ता. कोरेगाव व वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार हिंमंतराव हिंदुराव पाटील रा. सुपने ता. कराड यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

कृषी विभागाने २०२३ व २०२४ च्या विविध दहा पुरस्कारासाठी राज्यभरातील ९३ व ९१ अशी एकूण १८४ शेतकरी व्यक्ती, संस्था आणि गटांची निवड केली आहे. राज्यातील कृषी क्षेत्रातील नवकल्पना, उत्पादन वाढ, शाश्वत शेती फालोत्पादन आणि शेतकरी मार्गदर्शन या मधील उल्लेख निहाय योगदानाची दाखल घेऊन हा सन्मान दिला जातो.

कृषी विभागाच्या शासन निर्णयनुसार पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण, सेंद्रिय शेती कृषीभूषण. वसंतराव नाईक शेतीमित्र, युवा शेतकरी, उद्यान पंडित, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार आणि पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न अशा विविध कृषी पुरस्कारंचा समावेश आहे. कृषी पुरस्कारासाठी निवड झालेल्या पुरस्कारर्थी यांना सपत्नीक १ जुलै २०२६ रोजी नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (NSCI Dome), वरळी, मुंबई येथे राज्यपाल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

तृतीयपंथीयांच्या हक्क व कल्याण योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध.

vishwatmaklokswamivarta

पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) दि.10 ते 14 जुलै पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना…

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी…

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाजहितासाठी उद्योग क्षेत्राचे योगदान प्रेरणादायी

राष्ट्रीय क्रीडा दिन सोहळा मुलांनो भरपूर खेळा; पण मैदानावर…मोबाईलवर नव्हे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी