vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

तृतीयपंथीयांच्या हक्क व कल्याण योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

तृतीयपंथीयांच्या हक्क व कल्याण योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

 

जालना, प्रतिनिधी : तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी जालना येथे विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत तृतीयपंथीय नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा मिळवता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यात तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत जिल्हास्तरावर तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील तृतीयपंथीय नागरिकांना शासनाच्या योजना व सुविधा समजावून सांगण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे आयोजित या कार्यशाळेस अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षेत व तृतीयपंथीयांचे गुरु तथा संस्थापक अध्यक्ष मोहम्मद शफीक बक्श (कालम गुरु नानी) यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी तसेच समाजकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

कार्यशाळेत तृतीयपंथीय नागरिकांना शिक्षण, आरोग्य, रोजगार, कौशल्य विकास, सामाजिक सुरक्षा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत माहिती देण्यात आली. यासोबतच आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, शासकीय कागदपत्रे, आरोग्य सेवा तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

 

या कार्यशाळेत जिल्हा शल्य चिकीत्सक, जालना, व जिल्हा आरोग्य्‍ अधिकारी, जिल्हा परीषद जालना आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी, जालना यांच्या मार्फत आरोग्य्‍ तपासणी तसेच क्षयरोग तपासाणी शिबिरांचे आयोजन करुन आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले, सहायक आयुक्त,रोजगार व कौशल्य विकास कार्यालयामार्फत आर्थिक उन्न्तिषकरीता रोजगारबाबत मार्गदर्शन करण्यात आले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जालना यांच्या मार्फत कायदेविषक सल्ला मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत रेशन कार्ड देणे व अन्नधान्य पुरवठा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी (निवडणुक) जालना यांच्याकडुन निवडणुक ओळखपत्र देणेबाबात. महसुल विभागामार्फत घरकुल बांधकामाकरीता व सश्मानभुमी (दफनभुमी) करीता जमीन उपलब्ध करुन देणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद तसेच इतर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी तृतीयपंथीयांसाठी उपलब्ध असलेल्या योजना व सुविधांची माहिती दिली. यावेळी उपस्थित तृतीयपंथीय नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि सूचनाही यावेळी जाणून घेण्यात आल्या.

 

या कार्यशाळेस जालना जिल्हातील तृतीयपंथीय नागरीकांना मार्गदर्शन करणेकरीता अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, तृतीयपंथीयांचे गुरु तथा संस्थापक अध्यक्ष मोहम्मद शफीक बक्श् (काजल गुरु नानी), प्रविण पाखरे, साक्षी उगले, जिल्हा कौशल्य अधिकारी भुंजग रेठे, क्षयरोग अधिकारी डॉ.गोपाल कुडलीकर, वैद्यकिय अधिकारी डॉ. नागरे, वैद्यकिय अधिकारी डॉ. नागदरवाड, वैद्यकिय अधिकारी डॉ. रमेश काकड, तसेच दामीनी पथक फिरदोस पठाण , माया ठोके, ज्योती राठोड, राजू निहाल नायब तहसिलदार, गीता चव्हाण आरोग्य परीवेक्षक राजु पवार क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी ,वैद्यकिय टीम, बिस्मीला सय्यद सहारा सामाजिक विकास संस्था उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्तावीक गणेश अंबोरे यांनी केले तर डॉ. दिलीप गिरी यांनी सुत्रसंचालन केले.00000

संबंधित पोस्ट

जनगणना 2027′ साठी तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण.

उपमुख्यमंत्री कार्यालय (जनसंपर्क कक्ष)मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प,सामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा; ग्लोबल मुंबईचा शुभारंभ- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

चिखली नगरपरिषद अध्यक्षपदी भाजपचे पंडितराव देशमुख; भाजपचे वर्चस्व…

vishwatmaklokswamivarta

प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांचे तत्परतेने निवारण करावे- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जालना जिल्हा केबल सेना ऑपरेटर संघटनेच्या ‘समन्वयकपदी’ डॉ.रामकृष्णभोंडोने यांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या सदस्य निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर*