vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

तांदुळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून’प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

तांदुळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून’प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

मुंबई, प्रतिनिधी –

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे १४ जून २०२६ रोजी पिकअप वाहन विहिरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ८ जणांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत एकूण ४० लाख रुपयांची मदत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित वारसांना वितरित करण्यात आली.

माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे पंढरपूर-सातारा मार्गावर पिकअप वाहन विहिरीत कोसळून अपघात झाला होता. या अपघातात इंदुबाई दशरथ बावचे (वय ६५), पूजा अमोल सातुरे (वय २३), पूजाव बालाजी बावचे (वय २७), अश्विनी संदीप बावचे (वय २७), संस्कार संदीप बावचे (वय १४), संस्कृती संदीप बावचे (वय १४), भारव अमोल सातुरे (वय ८) आणि समर्थ बालाजी बावचे (वय ६ महिने) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांनी आर्थिक मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये, अशी एकूण ४० लाख रुपयांची आर्थिक मदत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वितरित करण्यात आली.

0000

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल लवकरच जाहीर होणार

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी जिल्ह्यात ६९.९१ टक्के मतदान*

vishwatmaklokswamivarta

दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत एकरकमी तडजोडीची संधीआधार प्रमाणीकरणानंतर कर्जमाफीची रक्कम थेट कर्जखात्यात जमा होणार

जात प्रमाणपत्र पडताळणीतील त्रुटींच्या पूर्ततेसाठी विशेष शिबिराचे आयोजन-‘सेवा संकल्प अभियान’ कालावधीत विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी उपक्रम

vishwatmaklokswamivarta

मत्स्यव्यवसायिक श्री. शिवाजी कृ. पाटील यांची विशेष अतिथी म्हणून निवड…

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभागाच्या माहिती पुस्तकांच्या स्टॉलचे मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन समता रॅली व नागार्जुन संग्रहालयाचे उद्घाटन