vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

सामाजिक न्याय विभागाच्या माहिती पुस्तकांच्या स्टॉलचे मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन समता रॅली व नागार्जुन संग्रहालयाचे उद्घाटन

सामाजिक न्याय विभागाच्या माहिती पुस्तकांच्या स्टॉलचे मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन समता रॅली व नागार्जुन संग्रहालयाचे उद्घाटन..

नागपूर, प्रतिनिधी : ६९ व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून दिक्षाभूमी नागपूर येथे येणाऱ्या सर्व भाविकांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती मिळावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परीसरात लावण्यात आलेल्या स्टॉलचे उद्घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट व खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी नागपूर यांच्याद्वारे आयोजित समता रॅली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे लावण्यात आलेल्या नागार्जुन संग्रहालयाचे उद्घाटनही करण्यात आले.माहिती पुस्तके, बुकलेट, घडी पुस्तिका आदीद्वारे सर्वसामान्य जनतेला माहिती पोहोचविण्याचे काम या स्टॉलद्वारे करण्यात येत आहे.

यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र पवार, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, चंद्रपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. सिद्धार्थ गायकवाड, नागपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. मंगेश वानखडे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी, आशा कवाडे, जिल्हा परीषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुखदेव कौरती आदी उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध महसूली कामांचा आढावा;फार्मर आयडी तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबवा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

पहलगाम येथील दहशतवादी हल्ला प्रकरणी जिल्हा नियंत्रण कक्ष-कार्यान्वित; संपर्क साधण्याचे आवाहन

गणेशपूर होणार ‘कवितेचे गाव’; लाखनी ‘पुस्तकांचे गाव’ जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषेसाठी स्वतंत्र कक्ष; मान्यवर साहित्यिकांशी मंत्री डॉ. उदय सामंत यांचा संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 5 फेब्रुवारी रोजी महाकुंभाला भेट

vishwatmaklokswamivarta

स्वीप समितीच्या वतीने ‘मनपा ऑन एअर’ उपक्रम-विविध रेडिओ वाहिन्यांवरून प्रेरक मुलाखती व संदेश प्रसारित…

vishwatmaklokswamivarta

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन