vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध महसूली कामांचा आढावा;फार्मर आयडी तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबवा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध महसूली कामांचा आढावा;फार्मर आयडी तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबवा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

         बुलडाणा, प्रतिनिधी शासनाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

 जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृह येथे जिल्ह्यातील तालुक्यांनिहाय महसूलविषयक कामांचा आढावा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला, त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अप्पर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी सुहासिन गोणेवार, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, अधिकारी यावेळी उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी तयार केले जात आहे. नोंदणी करण्याची प्रक्रिया ही संथ असून ती वेगवान करावी. यासाठी तलाठी व सीएससी केंद्रामार्फत विशेष मोहिम राबवावी. शेतकरी बांधव व सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी महाराजस्व अभियानाची परिपूर्ण अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यानुसार कार्यवाही करुन सर्व प्रलंबित फेरफार निकाली काढावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.

बैठकीमध्ये विविध विषयाचा आढावा घेऊन ध्वजदिन निधीचे दिलेले उद्दिष्टे प्रत्येक तालुक्याने निर्धारित कालावधी पूर्ण करावे. ई-चावडी प्रणाली, ई फेरफार प्रणालीचा आढावा यावेळी घेतला. शासनाने प्रत्येक तालुका, गावपातळीवर शेतकरी व नागरिकांचे समस्या निकाली काढण्याकरीता 1 जून ते 31 जुलै 2025 या कालावधीत महाराजस्व अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्याने नियोजन करुन महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

0000000

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यातील नव वर्ष स्वागत यात्रेत जिल्हा परिषदेच्या चित्ररथास उत्स्फूर्त प्रतिसाद…

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेला भेट

कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी-व्यक्ती,गट, संस्थानी प्रस्ताव सादर करावेत

विठ्ठल दर्शनासाठी खामगावहून ‘हरीभक्तांची’ रेल्वे पंढरपूरकडे रवाना- केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हिरवी झेंडी

महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम

शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन