vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी-व्यक्ती,गट, संस्थानी प्रस्ताव सादर करावेत

कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी-व्यक्ती,गट, संस्थानी प्रस्ताव सादर करावेत

रायगड( प्रतिनिधी:-कृषी विभागामार्फत सन-2023 या वर्षांमध्ये जिल्ह्यातील कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्थानी विविध कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे.

 राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरीता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था,गट यांना डॉ.पंजाबराव देशमुख, कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, सेंद्रीय शेती कृषीभूषण पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार,वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व कृषी विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांना पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.००

संबंधित पोस्ट

निम्न पेढी प्रकल्पातील स्थलांतराला वेग द्यावा- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री यशस्वी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

मुरूड तालुक्यात ४ ऑगस्ट रोजी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत महसुल शिबिरांचे आयोजन..

🚫 सावधान! आचारसंहिता भंगाचा प्रयत्न महागात पडणार; जालना प्रशासनाचा कडक इशारा! ⚖️

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 26.13 टी.एम.सी. पाणीसाठा

कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास देण्यास मंजुरी देण्यात आली. केंद्राच्या मान्यतेनंतर, सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे होणार आहे.